Viral post : बांधकामांच्या ठिकाणी दिसणारी ती 'गूढ' महिला कोण? सोशल मीडियाने सोडवले कर्नाटकातील 'कोडे'!

बांधकांमावर फोटो लावण्‍यात आलेल्‍या महिलेचा गुगल लेन्‍सच्‍या मदतीने शोध घेण्‍याचा प्रयत्‍न
Viral post
बंगळूरुमधील बांधकाम सुरु असणार्‍या इमारतींसह अन्‍य ठिकाणीही लावण्‍यात आलेला महिलेचा फोटोची पोस्‍ट सध्‍या सोशल मीडियावर व्‍हायरल होत आहे.
Published on
Updated on
Summary

एका तरुणीस कर्नाटक प्रवासादरम्यान विचित्र गोष्ट निदर्शनास आली की, येथे बांधकाम सुरू असणार्‍या काही इमारतींवर का साडी नेसलेल्या आणि डोळे मोठे करून पाहणाऱ्या महिलेचा फोटो लावलेला आहे.

social media viral post

बंगळूरु : कोणत्‍याही शहरातून प्रवास करताना आपले लक्ष अनेकदा नवीन दुकाने, जाहिराती किंवा रिक्षांच्या मागे लिहिलेल्या मजकुराकडे जाते. मात्र, सध्या संपूर्ण कर्नाटकातील रस्ते एका वेगळ्याच चर्चेने गाजत आहेत. ठिकठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या इमारतींवर एका मोठ्या डोळ्यांच्या 'गूढ' महिलेचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही महिला नेमकी कोण, असा प्रश्न सर्वांना पडला असतानाच आता सोशल मीडियाने या 'मिस्टरी वुमन'चे कोडे अखेर सोडवले आहे.

सोशल मीडियावर पोस्‍ट करत महिला काढला माग!

एका तरुणीस कर्नाटक प्रवासादरम्यान एक विचित्र गोष्ट निदर्शनास आली. येथील नवीन इमारतींचे बांधकाम सुरू होते, तिथे एका साडी नेसलेल्या आणि डोळे मोठे करून पाहणाऱ्या महिलेचा फोटो लावलेला दिसत होता. तिने गुगल लेन्सच्या मदतीने या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण तिला कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिने 'एक्‍स' वर हा फोटो शेअर करत विचारले, "ही महिला कोण आहे? ही मला कर्नाटकभर बांधकामाच्या ठिकाणी का दिसते?" असे सवाल केला होता.

इंटरनेटवर चर्चेला उधाण

५ जानेवारी २०२६ रोजी पोस्ट केलेल्या या फोटोला आतापर्यंत ३४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सुरुवातीला अनेक नेटकऱ्यांनी यावर विविध तर्कवितर्क लढवले. काहींनी याला वाईट नजरेपासून वाचवणारे कवच) म्हटले, तर काहींनी मजेशीरपणे ही चोरांना घाबरवण्यासाठी लावलेली प्रतिमा असल्याचे सांगितले.

Viral post
Viral Post : इन्स्टाग्रामवर मेसेज.. गॅस शेगडीभोवती सात फेरे; मॉलमध्ये काम करणाऱ्या दोन तरुणींच्या लग्नाची गावभर चर्चा
Pudhari

अखेर गूढ उकलले!

एका 'X' युजरने एआय (AI) प्लॅटफॉर्मच्या मदतीने या महिलेची ओळख पटवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला कर्नाटकातील एक प्रसिद्ध युट्युबर निहारिका राव आहे. २०२३ मध्ये तिच्या एका व्हिडिओमधील 'आश्चर्यचकित झालेली' एक्सप्रेशन असलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. स्थानिक लोकांनी तिच्या या मिम्सचा वापर करून त्याला 'दृष्टी गोम्बे' (वाईट नजर काढणारी बाहुली) म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पारंपारिकपणे, बांधकामाच्या ठिकाणी अशी बाहुली लावली जातात. मात्र, आता निहारिका रावचा हा फोटो एक नवीन ट्रेंड बनला असून, चक्क 'मीम'चा वापर वाईट नजरेपासून वाचण्यासाठी केला जात असल्याचे पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Viral post
Viral Post : हौसिंग सोसायटीच्या 'नकोश्या' लुडबुडीला तरुणीचे सडेतोड उत्तर; ठोकला ६२ लाखांचा अब्रूनुकसानीचा दावा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news