Mumbai road accident : माजी खा. सुधीर सावंत यांच्या कारच्या धडकेत पालिका कर्मचाऱ्याचा मृत्यू

कर्मचाऱ्याची पत्नी आणि अन्य दुचाकीस्वार जखमी; खार पोलिसांकडून गुन्हा दाखल
Mumbai road accident
Mumbai road accidentpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : खार पश्चिम येथे माजी खासदार आणि निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सीताराम सावंत यांच्या कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. इयाप्पन सेल्वराज हरिजन (४१) असे मृताचे नाव आहे. या अपघातात त्यांची पत्नी नॅन्सी (३७) आणि अन्य एक दुचाकीस्वार राहुल घाणेकर जखमी झाले आहेत. या प्रकरणी खार पोलिसांनी सुधीर सावंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सावंत यांची कार ताब्यात घेतली आहे.

सी. डी. रोड आणि १६ वा रस्ता जंक्शन येथे सोमवारी सायंकाळी हा अपघात झाला. इयाप्पन हे पत्नी नॅन्सीसह दुचाकीवरून वांद्र्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी मागून आलेल्या कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेनंतर इयाप्पन कारखाली अडकले. नागरिकांनी कार उचलून त्यांना बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai road accident
Mumbai bribery case : २५ लाखांच्या बिलासाठी ५० हजारांची लाच

धडकेनंतर सावंत यांच्या कारने अन्य एका दुचाकीलाही धडक दिली. त्यात राहुल घाणेकर यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले. अपघाताचे संपूर्ण दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांकडून फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कार वेगाने आणि निष्काळजीपणे चालवली जात असल्याची माहिती समोर आली आहे. सावंत हे दादरहून खार येथील घरी परतत असताना अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Mumbai road accident
NEET online exam : ‘नीट’ परीक्षा आता ऑनलाईन होणार?

कारचा वेग किती होता हे तपासणार

अपघातानंतर सावंत यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. अपघातावेळी कारचा नेमका वेग किती होता, तसेच अपघाताच्या कारणांचा तपास सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news