Mumbai bribery case : २५ लाखांच्या बिलासाठी ५० हजारांची लाच

डब्ल्यूसीएलचा वरिष्ठ अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात
Mumbai bribery case
Mumbai bribery casepudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) उमरेड क्षेत्रातील गोेकुळ मुरपार उपक्षेत्रात कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधीक्षकाला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना केंद्रीय अन्वेषण विभागाने रंगेहाथ पकडले. पवन नखाते, वरिष्ठ अधीक्षक (सिव्हिल) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या २५ लाखांहून अधिक रुपयांच्या बिलाचे देयक मंजूर करून देण्यासाठी दोन टक्के रक्कम लाच म्हणून मागितल्याचा आरोप आहे. सीबीआयने ३० सप्टेंबर रोजी सापळा रचून ही कारवाई केली.

Mumbai bribery case
fake CSR donation scam : बनावट सीएसआर देणगी रॅकेट; ईडीची आठ ठिकाणी छापेमारी

सीबीआयच्या माहितीनुसार, पवन नखाते हे डब्ल्यूसीएलच्या उमरेड क्षेत्रातील गोेकुळ मुरपार उपक्षेत्रातील सिव्हिल विभागात वरिष्ठ अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तक्रारदाराला पिरवा गावाच्या पुनर्वसनस्थळी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कंत्राट मिळाले होते.

या कामांत दोन बोअरवेल खोदणे, त्यामध्ये सबमर्सिबल पंप बसविणे, तसेच अंतर्गत मुख्य आणि वितरण पाइपलाइन टाकण्याचा समावेश होता. या कामाच्या तक्रारदाराने सादर केलेल्या २५ लाख ३५ हजार ६९३ रुपयांच्या बिलाच्या दोन टक्के रक्कम म्हणजे ५० हजार ७१३ रुपये इतकी लाच मागण्यात आल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

Mumbai bribery case
NEET online exam : ‘नीट’ परीक्षा आता ऑनलाईन होणार?

तक्रारीनंतर सापळा

तक्रार सीबीआयकडे प्राप्त झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तिची पडताळणी केली. दरम्यान लाच मागितल्याच्या आरोपाची खात्री झाल्यानंतर सीबीआयने ३० सप्टेंबर रोजी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ५० हजार स्वीकारताना नखाते यांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर नखाते यांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news