नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद शहापूरकर यांचे निधन

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते अरविंद शहापूरकर यांचे निधन
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विदर्भाचे माजी विभाग संघटन मंत्री अरविंद शहापूरकर यांचे शुक्रवारी मध्यरात्री एम्स रुग्णालयात निधन झाले. शहापूरकर काही दिवसांपूर्वी एका अपघातात जखमी झाले होते. यामध्ये त्यांच्या मेंदूला मोठ्या प्रमाणात इजा झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. मात्र, त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत कुठलीच सुधारणा झाली नाही. शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे शनिवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शहापूरकर यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. विदर्भात भाजपचे संघटन मजबूत करणारा समर्पित असा संघटक पक्षाने गमावल्याची भावना आज कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. जनसंघ किंवा भाजपचा फारसा प्रभाव नसतानाच्या काळात शहापूरकर यांनी भाजपचे कार्य विदर्भात वाढविण्यात महत्वाची भूमिका बजावली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी अत्यंत स्नेहाने वागणारा नेता म्हणून ते परिचित होते. यापूर्वीच्या अपघातातून ते सावरले मात्र बऱ्याच वर्षांपासून प्रकृती साथ देत नसल्याने ते पक्षात पूर्वीसारखे सक्रीय नव्हते. विदर्भाचा कुशल संघटक गमावल्याची संवेदना मान्यवर नेत्यांनी बोलून दाखविली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news