गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी 'एसटी'ला उदंड प्रतिसाद; २०३१ बसेस फुल्ल

ST Buses | मुंबई, ठाणे व पालघर विभागातून जादा बसेस
Response to 'ST' going to Konkan
बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. Pudhari News Network
Published on
Updated on

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: श्री गणरायाचे ७ सप्टेंबररोजी आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे व पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या १३०१ बसेस गट आरक्षणासह एकूण २०३१ जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झालेल्या आहेत. (ST Buses)

Response to 'ST' going to Konkan
'मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करा'

मुंबई, ठाणे, पालघर विभागांतून जादा बसेस

मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. (ST Buses)

Response to 'ST' going to Konkan
मुंबई |तौबा-तौबा... टॉवेल गुंडाळून रस्त्यावर आली तरुणी...

एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते.

गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी-वस्ती पर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे ४३०० जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी २०३१ बसेस फुल्ल झाल्या आहेत. (ST Buses)

Response to 'ST' going to Konkan
Mumbai Highway | मुंबई महामार्ग डागडूजीसाठी दहा दिवसांचा अल्टीमेटम

प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे

अर्थात, गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २ ते ७ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहे उभारण्यात येणार आहेत. (ST Buses)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news