.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर कोणता ट्रेंड आणि स्टंट काही सेकंदात व्हायरल होईल सांगता येत नाही. ‘तौबा-तौबा’ गाणे सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे. या व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात रिल्स व्हायरलं होत आहेत. दरम्यान एक तरुणी टॉवेल गुंडाळून रस्त्यावर वावरत असताना पार्श्वभूमीला ‘तौबा-तौबा’ गाणे असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरलं होवू लागला आहे. हा व्हिडिओ मुंबईच्या रस्त्यावरील आहे. तरुणी टॉवेल गुंडाळून रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्या तरुणीच नाव तनुमिता घोष आहे, जी इंस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे, तिचे इंस्टाग्रामवर 37,000 हून अधिक फॉलोअर्स आहेत. या व्हिडिओमध्ये 'तौबा-तौबा' गाणे आहे, ती स्टाईलिश स्पोर्ट्स शूज घालून आहे. तिचा हा व्हिडिओ तब्बल 10 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाईक्स आणि शेअर्स मिळाले आहेत.
तथापि, या व्हिडिओवरुन तनुमतीला सोशल मिडिया युजर्सने संमिश्र भावना व्यक्त केल्या आहेत. काहीनी तिला स्टंट म्हटले आहे. तिच्या या व्हिडिओवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. एका युजरने कुचकामी व्हिडिओ म्हटले आहे.