SRA Rent Recovery: एसआरएकडून ५२ कोटी थकीत भाड्याची वसुली

विशेष भाडे न्यायनिवाडा व वसुली कक्षाची कारवाई; उपनगरातील २ हजार ५८ प्रकरणांपैकी १ हजार ८६२ निकाली
SRA Rent Recovery
SRA Rent RecoveryPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या विशेष भाडे न्यायनिवाडा व वसुली कक्षाने मुंबई शहर व उपनगरांमध्ये मिळून एकूण ५२ कोटी थकीत भाड्याची वसुली केली आहे. तसेच पुढील दोन वर्षांसाठी दीड हजार कोटींचे आगाऊ भाडेही वसूल करण्यात आले आहे.

भाडे वसुलीसाठी दोन विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. कक्ष १ अंतर्गत मुंबई पूर्व व पश्चिम उपनगराचा समावेश होतो. कक्ष २ अंतर्गत मुंबई शहराचा समावेश होतो. उपनगरात एकूण २ हजार ५८ प्रकरणे प्राप्त झाली होती.

SRA Rent Recovery
11th Admission: अकरावी प्रवेशाबाबत मोठी अपडेट! १२ वी विशेष फेरी जाहीर; सप्टेंबरअखेरपर्यंत प्रवेशाची संधी

त्यापैकी १ हजार ८६२ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या प्रकरणांमध्ये ३७ कोटींहून अधिक भाड्याची रक्कम वसूल करण्यात आली असून ६१ कोटींहून अधिक रकेमबाबात झोपडीधारकांच्या बाजूने आदेश पारित करण्यात आला आहे. १६३ प्रकरणांमध्ये अद्याप सुनावणी सुरू आहे.

मुंबई शहरात आतापर्यंत १ हजार ६८७ प्रकरणे प्राप्त झाली आहेत. त्यापैकी १ हजार ५४८ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. १५ कोटींहून अधिक भाड्याची रक्कम वसूल करण्यात आली असून ५६ कोटींहून अधिक रकमेबाबत झोपडीधारकांच्या बाजूने आदेश पारित करण्यात आले आहेत. सध्या ११५ प्रकरणांवर सुनावणी सुरू आहे.

SRA Rent Recovery
Sahil Wakode Case: साहिलला न्याय मिळेपर्यंत आझाद मैदानात ‘ठिय्या’; वडील रवींद्र वाकोडे यांचा निर्धार

दोन वर्षांसाठी आगाऊ रक्कम

कक्ष १ व सहकार विभागांतर्गत २०२५-२६मध्ये पुढील दोन वर्षांसाठी ४१७ योजनांमधून १४४०.२२ कोटी रुपये भाडे वसूल करण्यात आले. कक्ष २ व सहकार विभागांतर्गत विकासकाकडून ८२.७७ कोटी भाडेवसुली करण्यात आली. ही रक्कम १५ हजारांहून अधिक एसआरए योजनांमधील रहिवाशांना वाटण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news