‌SRA investment fraud case : ‘एसआरए‌’त गुंतवणुकीच्या आमिषाने चौदा कोटींचा गंडा

गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेेकडे वर्ग; खासगी कंपनीच्या दोन संचालकांनी फसवणूक केल्याचे उघड
SRA investment fraud case
‘एसआरए‌’त गुंतवणुकीच्या आमिषाने चौदा कोटींचा गंडाpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : बोगस करार करून एसआरए प्रकल्पात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवत काही बांधकाम व्यावसायिकांची सुमारे 14 कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शंका येऊ नये म्हणून बोगस झोपडीधारक दाखवून तक्रारदारांचा विश्वास संपादन केल्याचेही उघडकीस आले आहे.

बोरिवलीतील एका व्यावसायिकाला आशाप्रकारे पाच कोटींचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी एका खासगी कंपनीच्या मनसुख शाह आणि आकाश मनसुख शाह या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासात त्यांनी अशाच प्रकारे इतर काही व्यावसायिकांची सुमारे चौदा कोटींची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

SRA investment fraud case
First woman officer Matheran : माथेरान पोलीस ठाण्याची जबाबदारी महिला अधिकाऱ्याकडे

तक्रारदार रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन व्यावसायिक असून ते बोरिवली परिसरात राहतात. त्यांची एक खासगी कंपनी असून ही कंपनी एसआरए पुनर्विकासाचे काम करते. मार्च 2025 रोजी त्यांची आकाश आणि मनसुख शाह यांच्याशी ओळख झाली होती. त्यांची शाह हाऊसकॉन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी असून ते दोघेही कंपनीत संचालक म्हणून आहेत. त्यांनी त्यांचा मालाडच्या राणी सती मार्ग, खोतडोंगरी सहकारी सोसायटीच्या एसआरए प्रोजेक्ट सुरू असल्याचे सांगून त्यांना प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची ऑफर दिली होती. सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांची ऑफर त्यांना आवडली. त्यामुळे त्यांनी त्यांच्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.

याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. कराराप्रमाणे त्यांनी शाह यांच्या कंपनीला मे ते जुलै 2025 या कालावधीत पाच कोटी पंधरा लाख रुपयांचे पेमेंट केले होते. त्यांच्यात झालेल्या एमओयू आणि पूरक एमओयू कराराप्रमाणे सर्व अटी आणि शर्तींचे पालन करण्याची जबाबदारी मनसुख शाह आणि आकाश शाह यांच्यावर होती. मात्र तीन महिने उलटूनही त्यांनी खोतडोंगरी सहकारी सोसायटीच्या पुनर्विकासासाठी झोपडपट्टी रिकामी करणे, पुनर्विकास प्रोजेक्टचे टायटल क्लीअर न करणे तसेच त्रयस्थ पक्षांशी समन्वय न साधणे आदी कोणतीही कामे केली नव्हती.

याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी त्यांना प्रोजेक्टमधून काढून टाकण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

SRA investment fraud case
Raigad Fort highway : किल्ले रायगड महामार्ग तर बनला; नेटकेपणा कधी येणार?

बोगस झोपडीधारक

चौकशीत आरोपींनी इतर व्यावसायिकांसोबत बोगस करार केले आहेत. युसूफ साजिदा नावाच्या व्यक्तीला हाताशी धरून त्याने संबंधित झोपडीधारकांना तीन ते चार हजार रुपये भाडे सुरू केले होते. नंतर त्यांनी भाडे बंद केल्यानंतर त्यांनी त्यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या जागेत नोंद केलेले काही झोपडीधारक बोगस होते. त्याचा संबंधित जागेशी काहीही संबंध नव्हता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news