मुंबई : स्लॅब कोसळून सहा जण गंभीर जखमी

मुंबई : स्लॅब कोसळून सहा जण गंभीर जखमी

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा: नवी मुंबई नेरूळ सेक्टर १९ ए येथील जिमी टॉवरच्या सहाव्या मजल्यावर दुरुस्ती काम सुरू असताना शनिवारी (दि. ११) रोजी दुपारी १२:३० ते १ वाजण्याच्या सुमारास पूर्ण माळा खाली कोसळण्याची घटना घडली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमीची नावे निशा धर्मानी (वय ५०), दिपा धर्मानी (वय २०), त्याग राजन (वय ८४), त्याग राजन यांची पत्नी (वय ८०), सोनाली गोडबोले (वय २०) आणि गोडबोले (वय १५) अशी आहेत.

या घटनेतील सर्व जखमींना महापालिका रूग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती नवी मुंबई महापालिका अग्निशमन विभागाचे प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे मदत कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news