राजगुरूनगरला कोणाला संधी, कोणाची निराशा याची उत्सुकता; सोमवारच्या आरक्षण सोडतीकडे शहराचे लक्ष | पुढारी

राजगुरूनगरला कोणाला संधी, कोणाची निराशा याची उत्सुकता; सोमवारच्या आरक्षण सोडतीकडे शहराचे लक्ष

राजगुरूनगर, पुढारी वृत्तसेवा: दोन वर्षांपूर्वी म्हणजे 18 फेब्रुवारी 2020 साली राजगुरूनगर नगरपरिषदेसाठी आरक्षण सोडत झाली होती. त्यानंतर कोरोना महामारी आल्याने निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलली. त्यावेळीच्या आरक्षणात अनेक विद्यमान नगरसेवकांच्या संधी हुकल्या होत्या. सोमवारी(दि.13) होणार्‍या आरक्षण सोडतीमध्ये कुणाला संधी मिळणार? कोणाला नाही, हे नव्याने स्पष्ट होणार आहे.
राजगुरुनगर नगर परिषदेत नव्याने 10 प्रभाग झाले आहेत. 21 सदस्य संख्या झाली आहे. त्याची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रभाग रचनेत 4 हरकतीवर सुनावणी झाली. मात्र त्या सर्व हरकती अमान्य करण्यात आल्या.

शहरातील 10 प्रभागात 28 हजार 592 लोकसंख्या असून, त्यानुसार 10 प्रभाग करण्यात आले आहेत. प्रभाग क्रमांक एक मध्ये 2923, प्रभाग क्रमांक 2 मध्ये 2562, प्रभाग क्रमांक 3 मध्ये 2799, प्रभाग क्रमांक 4 मध्ये 2607, प्रभाग क्रमांक 5 मध्ये 2502, प्रभाग क्रमांक 6 मध्ये 2467, प्रभाग क्रमांक 7 मध्ये 4418, प्रभाग क्रमांक 8 मध्ये 3077, प्रभाग क्रमांक 9 मध्ये 2537 आणि प्रभाग क्रमांक 10 मध्ये 2700 लोकसंख्या आहे. त्यानुसार आरक्षण सोडत होणार आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वाधिक म्हणजे तीन सदस्य संख्या असणार आहे.

राजगुरूनगर नगरपरिषद स्थापन होऊन सात वर्षे झाली. यात 5 वर्षे नगरसेवक, तर 2 वर्षे प्रशासक असा कालावधी गेला. आता नगर परिषदेच्या इतिहासातील दुसरी पंचवार्षिक निवडणूक होत आहे.

Back to top button