Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1 हजार 63 कोटींच्या प्रस्तावाला मान्यता

विदर्भातील दळणवळण आणि उद्योगांना चालना देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सहा वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikFile Photo
Published on
Updated on

मुंबई : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 1 हजार 63 कोटी रूपयांच्या कामांना मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना उत्तम सोयी-सुविधा मिळण्यासाठी प्रस्तावित पायाभूत सुविधांची कामे गतीने करावीत. भाविकांसाठी वाहनतळ , पाणीपुरवठा, विद्युतविभाग, आरोग्य विभाग, घनकचरा व्यवस्थापन, मुख्य नियंत्रण कक्ष यासाठी 1 हजार 63 कोटी रूपयांच्या कामांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून ही कामे गतीने पूर्ण करावीत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Simhastha Kumbh Mela Nashik
Virar–Alibag Multimodal Corridor Approved: विरार-अलिबाग मार्गिकेला प्रशासकीय मान्यता; राज्यातील सर्वात महागडा रस्ता प्रकल्प

तीन द्रुतगती महामार्ग प्रकल्प

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नागपूर-गोंदिया, भंडारा-गडचिरोली आणि नागपूर-चंद्रपूर या तीन द्रुतगती महामार्ग या प्रकल्पांचे प्रकल्प कार्यान्वित करण्याचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या सुचना तसेच निविदा प्रसिद्धी, निविदा अंतिम करणे आणि प्रकल्प पूर्णतेचा कालावधी निश्चित करावा. या प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी हुडकोकडून कर्ज उभारण्याच्या प्रस्तावावर वित्त विभागाशी समन्वय साधून तातडीने मार्ग काढावा. विदर्भातील दळणवळण आणि उद्योगांना चालना देण्यासाठी हे प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे असल्याने सहा वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी कार्यवाही करावी, असे निर्देश फडणवीस यांनी बैठकीत दिले.

Simhastha Kumbh Mela Nashik
Mumbai Infrastructure Projects: महामुंबईत पायाभूत सुविधांचा वेग वाढला; मेट्रो, भुयारी मार्ग व सागरी सेतूंना गती

नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग या महामार्गाची एकूण लांबी 162.577 कि.मी. असून, प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत 19,582.19 कोटी रुपये आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 3,162.18 कोटी रुपयांच्या खर्चास, भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग 94.241 कि.मी. लांबीच्या या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी 931.15 कोटी रूपये, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग हा प्रकल्प 204.799 कि.मी. लांबीचा असून याच्या भूसंपादनासाठी 2,353.94 कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चाला बैठकीत मंजुरी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news