Gold Auction: सिद्धिविनायक मंदिरात लिलावातून 96 लाख रुपये जमा

या लिलावातून एकूण 96 लाख 17 हजार 511 रुपये इतकी रक्कम न्यासाकडे जमा झाली आहे.
Gold Auction
Gold AuctionPudhari
Published on
Updated on

मुंबई: प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या दागिन्यांच्या लिलावाला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लिलावातून एकूण 96 लाख 17 हजार 511 रुपये इतकी रक्कम न्यासाकडे जमा झाली आहे.

मंदिर न्यासाच्या वतीने श्रींच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा हा जाहीर लिलाव रविवारी पार पडला. लिलावात एकूण 171 सोन्याचे अलंकार (वजन 684 ग्रॅम 820 मिलीग्रॅम) ठेवण्यात आले होते.

Gold Auction
Job Scam: महानगरपालिकेत नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना गंडा; अठरा जणांची फसवणूक, महिलेविरुद्ध गुन्हा

त्यापैकी 156 अलंकार (वजन 577 ग्रॅम 680 मिलीग्रॅम) विक्रीस गेले. या विक्रीतून 90 लाख 47 हजार 211 रुपये प्राप्त झाले, तर चांदीच्या नाण्यांच्या विक्रीतून 5 लाख 70 हजार 300 रुपये जमा झाले, अशाप्रकारे एकूण रक्कम 96 लाख 17 हजार 511 रुपये इतकी झाल्याची माहिती न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी दिली.

सिद्धीविनायक मंदिर हे मुंबईकरांचे श्रद्धास्थान असून, येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. बाप्पाला अर्पण केलेले दागिने आशीर्वादाच्या स्वरूपात मिळावेत, या भावनेतून भक्त मोठ्या उत्साहाने या लिलावात सहभागी होतात.

Gold Auction
Maharashtra heatwave: राज्यभर उष्णतेचा कहर; वर्ध्याचा पारा विक्रमी 45 अंशांवर!

ही परंपरा मंदिर न्यासाने अनेक वर्षांपासून जपली आहे. रविवारी लिलावासाठी आलेल्या भाविकांमध्ये मुंबईसह राज्यभरातून भक्त सहभागी झाले होते. अनेकांनी बाप्पाच्या चरणी अर्पण केलेले अलंकार प्रसाद स्वरूपात मिळावेत, या श्रद्धेने स्पर्धात्मक बोली लावत सहभाग नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news