Shivsena Thackeray group
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे.Pudhari News Network

Shivsena Thackeray group | विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला मोठा दिलासा : राजकीय निधी स्वीकारता येणार

निवडणूक आयोगाने दिली परवानगी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दिलासा मिळाला आहे. पक्षाला आता राजकीय निधी स्वीकारता येणार असल्याची परवानगी निवडणूक आयोगाने गुरुवारी ( दि. १८) दिली. यामुळे शिवसेना (उबाठा) पक्षाला सरकारी कंपनी व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्ती किंवा कंपनीतर्फे राजकीय निधी स्वेच्छेने स्वीकारता येणार आहे. मात्र ही परवानगी अंतरिम असल्याचे निवडणूक आयोगाने नमूद केले आहे.

Shivsena Thackeray group
Shiv Sena Dispute : शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? सुनावणी १५ जुलैला?

पक्षाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते.

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षाला राजकीय निधी स्वीकारण्याची परवानगी नव्हती. ही परवानगी मिळावी यासाठी पक्षाने निवडणूक आयोगाला १० जूनरोजी एक पत्र लिहून मागणी केली होती. त्या पत्राचा विचार करुन आयोगाने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. लोकप्रतिनीधी कायदा १९५१ च्या कलम २९ बी आणि २९ सी नुसार पक्षाला निधी स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली.

Shivsena Thackeray group
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची पंतप्रधानांकडे मोठी मागणी

दरम्यान, निवडणूक आयोगाने यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार यांना महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राजकीय निधी स्वीकारण्याची परवानगी दिली होती.

logo
Pudhari News
pudhari.news