शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची पंतप्रधानांकडे मोठी मागणी

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भरघोस निधी देण्याची मागणी
 MPs of Shiv Sena met PM Modi
शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. Pudhari News Network

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना शिंदे गटाच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी भेट घेतली. केंद्राच्या आगामी अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याला भरघोस निधी देण्याची मागणी या खासदारांनी पंतप्रधानांकडे केली.

 MPs of Shiv Sena met PM Modi
नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात ‘सीएए’ कायदा अडचण ठरणार

राज्यात नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देखील शिंदे गटाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदी यांना दिली. महाराष्ट्रातील विविध प्रश्नांबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पंतप्रधानांना भेट स्वरुपात देण्यात आली.

 MPs of Shiv Sena met PM Modi
नागपूर : शिंदे गट १०० टक्के भाजपमध्ये विलीन होणार: विजय वडेट्टीवार

या भेटीदरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील माने, खासदार संदिपान भुमरे, खासदार रविंद्र वायकर, खासदार नरेश म्हस्के, खासदार मिलिंद देवरा यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news