

Navi Mumbai Politics
नवी मुंबई : महायुतीत असताना तुमच्या बरोबर आलोत. महायुतीत राहून पुढची निवडणूक लढू. पण आम्हाला कमी लेखाल तर महापालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असा इशाराच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिला. ते युवा सेनेच्या मेळाव्यात वाशीत विष्णुदास भावे नाट्यगृहात बोलत होते.
शिंदे गट स्वबळावर उतरल्यास नवी मुंबईत शिंदे विरोधात नाईक असाच राजकीय सामना रंगणार आहे.
यापूर्वी शिवसेनेमुळे घरातली खासदारकी गेली आणि बेलापूरमधून मुलाचा विधानसभेला झालेला पराभव नाईकांच्या जिव्हारी लागला आहे. आता मंत्रिपद, पालघरचे पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर गणेश नाईक यांनी शिवसेनेला टार्गेट करत ठाण्यातून जनता दरबाराला सुरुवात केली.
शिंदे आणि नाईक यांचे राजकीय वैर पुन्हा वाढू लागले. त्यात आता महापालिका निवडणुकीत ते टोकाला जाऊ शकते.
शिंदे सेनेने महापालिका निवडणूक स्वबळावर लढवल्यास त्याचा राजकीय फायदा बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांना होईल. भाजपची तिकिट वाटपाची जबाबदारी ही व्हाईट हाऊसवर सोपवली जाईल. त्यांच्याकडे बेलापूर मतदार संघातील एक यादी म्हात्रे यांची असेल. मात्र त्या यादीतील नावे कापली जाऊ शकतात आणि नाईक समर्थक यांची नावे पुढे येण्याची दाट शक्यता आहे. म्हात्रे यांच्या यादीतील काही ठराविक उमेदवारांनाच मंत्री गणेश नाईक उमेदवारी देतील अशी शक्यता आहे.