Mumbai Politics News | स्थानिक निवडणुकीच्या घोषणेनंतर आघाडीबाबत निर्णय : काँग्रेस

Maha Vikas Aghadi | सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली
 Maharashtra Politics
Congress President Harshwardhan Sapkal Meets Uddhav Thackeray(File Photo)
Published on
Updated on

Maharashtra Politics

मुंबईः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार की नाही, याबाबत आघाडीत अद्यापही स्पष्टता नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकांची अधिसूचना निघाल्यानंतर आघाडीबाबत निर्णय घेतला जाईल, असे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

सपकाळ यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्तीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे है एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सपकाळ आणि ठाकरे यांच्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाली. या निवडणुका कशा लढाव्या, याबाबत दोन्ही पक्षांच्या काही भूमिका आहेत.

 Maharashtra Politics
Mumbai Political News : उत्तर मुंबईत ठाकरे गटाला आणखी एक धक्का? माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा

या निवडणुकीसाठी काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाला आघाडीचे अधिकार दिले असल्याची माहिती यावेळी उद्धव ठाकरे यांना दिली. या निवडणुकीची अधिसूचना निघाल्यावर मित्रपक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत भेण्याचा आमचा विचार आहे, अशी भूमिका सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना मांडली.

 Maharashtra Politics
Mumbai News : जहाज बांधणी- दुरूस्ती धोरण जाहीर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news