

पनवेल | केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नवी मुंबई आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे लवकरच कार्यरत होणार्या आंतरराष्ट्रीय विमानतळांच्या रक्षणासाठी 2,800 हून अधिक केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कर्मचार्यांची एकत्रित बळ मंजूर केले आहे. यात नवी मुंबई विमानतळासाठी 1,840 पदांचा समावेश आहे तर उत्तर प्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 1,030 पदे मंजूर केली आहेत.
या विमानतळांनी दुसरा टप्पा पूर्ण केल्यावर या दलाची ताकद वाढवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. सुरक्षा युनिट्स, ज्याचे नेतृत्व उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी करतील, दोन्ही सुविधांमध्ये सुरक्षा गॅझेट आणि इतर लॉजिस्टिक स्थापित करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार झाल्यानंतर ते कार्यभार स्वीकारतील,असे सुचित करण्यात आले.
अदानी समुहाने विकसित केलेला, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण केला जाईल आणि त्याची एकूण क्षमता वार्षिक 9 कोटी प्रवाशांची असेल. पहिल्या टप्प्यात वर्षाला 2 कोटी प्रवाशांना हाताळण्याची क्षमता असेल. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर मुंबई महानगर प्रदेशात दुसर्या क्रमांकावर असलेल्या या विमानतळावरील व्यावसायिक कामकाज मार्च-एप्रिल 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान,दोनच दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर पहिले प्रवासी विमान सुखरुपउतरविले गेले आहे. 17 एप्रिल 2025 पासून नियमित वाहतूक सेवा सुरु होणार आहे.तर जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानसेवा कार्यान्वित केली जाणार आहे.या विमानतळामुळे पनवेल,उरणसह नवी मुंबई परिसराचा मोठा कायापालट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.