मुंबई : पुढारी वृत्तसेवा
नायर हॉस्पिटल प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिलेंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला. या प्रकरणी भाजपने आक्रमक पवित्रा घेत, पालिका सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेनेही भाजप विरोधात घोषणाबाजी सुरू केली. अखेर महापौरांना सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. त्यानंतर शिवसेना-भाजप नगरसेवकांमध्ये झटापट झाली. (Sena vs BJP corporator)
स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आरोग्य समिती राजीनामा दिलेल्या भाजप नगरसेवकांना पळपुटे असा उल्लेख केल्यामुळे भाजप नगरसेवक संतप्त झाले. एवढेच नाही तर ते यशवंत जाधव यांच्या अंगावर धावून गेले. यावेळी शिवसेना नगरसेवकही भाजप नगरसेवकच्या दिशेने धावले. एकमेकांच्या विरोधात शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा गोंधळाच्या वातावरणात सभागृह सुरू झाले. (Sena vs BJP corporator)
हेही वाचा