पाच drug case चा तपास आमच्याकडे द्या; अमित शहांच्या आदेशाने दिल्ली एनसीबीची मागणी ! - पुढारी

पाच drug case चा तपास आमच्याकडे द्या; अमित शहांच्या आदेशाने दिल्ली एनसीबीची मागणी !

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

अंमली पदार्थांच्या drug case संदर्भात राज्यात करण्यात आलेल्या पाच मोठ्या गुन्ह्यांचा तपास केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आपल्याकडे देण्याची मागणी राज्य पोलिसांकडे केली आहे. एनसीबीच्या या मागणीने मात्र राज्यात पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले असून पून्हा एकदा एनसीबी विरुद्ध राज्य शासन असा संघर्ष निर्माण झाला आहे.

एनसीबीच्या मुंबई विभागीय पथकाने कॉर्डेलिया क्रुझवर आयोजित ड्रग्ज पार्टीवर छापा टाकला होता. यात बॉलिवूडचा किंग खान शाहरुख याचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. मात्र, या कारवाईवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. एनसीबीच्या या कारवाईनंतर राज्य शासन विरुद्ध एनसीबी असा संघर्ष पेटला.

राज्यातील मंत्र्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि एनसीबीच्या कारवाईवर आक्षेप नोंदविले. तसेच एनसीबीवर झालेल्या आरोपांप्रकरणी मुंबई पोलिसांच्या मार्फत तपास सुरू केला. तरीसुद्धा एनसीबीवरील आरोपांचे सत्र थांबताना दिसत नाही. अशातच एनसीबीने केलेल्या गुन्ह्यांचा तपास आपल्याकडे देण्याच्या मागणीवरुन नवीन वाद सुरू झाला आहे.

एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना २४ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवत राज्य पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधात कारवाई drug case केलेल्या गुन्ह्यांपैकी आंतरराज्यीय आणि आंतराष्ट्रीय ड्रग्ज कनेक्शन असलेले पाच मोठे गुन्हे आपल्याकडे वर्ग करण्याची मागणी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशानुसार एनसीबीने हे गुन्हे आपल्या ताब्यात घेणार असल्याचे कळवले आहे. या पत्रानुसार पाच महत्त्वाच्या गुन्ह्यांची यादी तयार करुन हे गुन्हे एनसीबीला वर्ग करावे लागणार आहेत.

एनसीबीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

एनसीबीने कार्डेलियावर छापा टाकल्यानंतर त्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीचे पंच, भाजपचे कार्यकर्ते आणि अन्य संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर झोनल ऑफिसर समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला. त्यानंतर वानखेडे यांच्यावर एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आरोप केले.

हेही वाचा : 

Back to top button