Mumbai News : ‘ती’ मगर प्राणी संग्रहालयातीलच; सीसीटीव्हीमध्ये उघड

Mumbai News : ‘ती’ मगर प्राणी संग्रहालयातीलच; सीसीटीव्हीमध्ये उघड

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : दादर शिवाजी पार्कच्या महात्मा गांधी जलतरण तलावात आलेली मगर बाजूच्या मिनी प्राणी संग्रहालयातीलच असल्याचे उघड झाले आहे. मुंबई महापालिकेने तपासलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही मगर प्राणी संग्रहालयातून येत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील मालकाचा मगर आपली नसल्याचा दावा खोटा ठरला आहे.

महात्मा गांधी जलतरण तलावात सापडलेल्या मगरीमुळे खळबळ उडाली होती. ही मगर नेमकी आली कुठून, असा प्रश्न मुंबई महापालिकेला पडला होता. दरम्यानच्या काळात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही मगर बाजूच्या मिनी प्राणी संग्रहालयातून आल्याचा दावा केला होता. मात्र प्राणी संग्रहालयाच्या मालकाने ही मगर आपली नसल्याचे सांगत आरोप फेटावून लावला होता. अखेर प्राणी संग्रहालयाच्या बाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीची बारकाईने तपासणी केली असता, मगरीचे पिल्लू प्राणी संग्रहालयातूनच जलतरण तलावात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे प्राणी संग्रहालयातील मालकाची अडचण आता वाढली आहे. दरम्यान, हे प्राणी संग्रालय नसून हा प्राणी तस्करीचा अड्डा, असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news