Mumbai News : महापालिकेसमोर कारने ४ जणांना उडवले | पुढारी

Mumbai News : महापालिकेसमोर कारने ४ जणांना उडवले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुंबई छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनल स्थानकाच्या बाहेर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याने चालत असलेल्या ४ जणांना उडवत पोलीस वाहन आणि एका शालेय बसला धडक दिली आहे. यात ३ जण गंभीर असून त्यांना संत जॉर्ज रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कार चालकावर आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

आझाद मैदान पोलिसांनी माहिती दिली की, मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान मुंबई छत्रपती शिवाजी महाराज महाराज टर्मिनल स्थानकाच्या शेजारील ९ पीओच्या दिशेकडून महापालिकामुख्यालच्या दिशेने येत असलेल्या एका टाटा टियागो कारमधील वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्याने एका शालेय बसला धडक दिली, गाडी अॅटोमॅटीक असल्याने चालकाला वाहनावर ताबा मिळवता आला नसल्याने गाडीचा वेग वाढल्याने रस्तावर चालत असलेल्या ४ जणांना उडविले, आणि नंतर पोलिसांच्या गाडीला धडक दिल्याने त्याची गाडी थांबली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

दिलीप चेतवाणी (७८) असे चालकाचे नाव असून ते मलाड येथील रहिवासी आहेत. काही कामानिमित्य ते मुंबईला आले होते. विजय रामवध (१८), सदाम अन्सारी (१७) अजय गुप्ता (१८) आणि प्रविण (१८) अशी जखमींची नावे आहेत. आझाद मैदान पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन तडाखे यांनी माहिती दिली की, पोलिसांनी आर- पीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी वैद्यकीय चाचण्यासाठी पाठविण्यात आले आहे

Back to top button