Shatrughan Sinha Khamosh Dialogue: सोशल मीडियाला ‌‘खामोश‌’ करण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा हायकोर्टात

सोशल मीडियावर प्रसिद्ध पंचलाइन, नाव व प्रतिमेच्या वापराला आव्हान; वैयक्तिक हक्कांच्या संरक्षणासाठी याचिका
Shatrughan Sinha Khamosh Dialogue
Shatrughan Sinha Khamosh DialoguePudhari
Published on
Updated on

मुंबई : बॉलीवूडमध्ये खामोश या संवादामुळे प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते, खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. खामोश या संवादासंदर्भातच वैयक्तिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सिन्हा यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या याचिकेची सोमवारी न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दखल घेतली आणि याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दाखवली.

Shatrughan Sinha Khamosh Dialogue
Ajit Pawar Plane Crash Black Box: ‘ब्लॅक बॉक्स सुरक्षित, पण राजकारण्यांपासून असुरक्षित?’ – रोहित पवारांचा घातपाताचा संशय कायम

‌‘खामोश‌’चा सोशल मीडियामध्ये सर्रास वापर केला जात आहे. माझी संमती न घेता माझ्या नावाचा, प्रतिमेचा आणि प्रसिद्ध पंचलाइनचा गैरवापर करण्यात येत आहे, असा आरोप शत्रुघ्न सिन्हा यांनी केला आहे. हा संवाद वापरणाऱ्या वेबसाइट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मविरुद्ध अंतरिम आदेश देण्याची विनंती केली आहे. सिन्हा यांच्या वकिलांनी यासंदर्भात युक्तिवाद केला. त्याची नोंद घेत न्यायमूर्ती देशमुख यांनी अंतरिम विनंतीसंदर्भात निर्णय राखून ठेवला.

Shatrughan Sinha Khamosh Dialogue
Muslim SEBC Reservation: मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

सोशल मीडियामध्ये माझ्या प्रसिद्ध डायलॉगचा तसेच नाव आणि प्रतिमेचा होत असलेला वापर हा मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा दावा सिन्हा यांनी केला आहे. त्यांनी 1976 च्या ‌‘छोटी सी बात‌’ चित्रपटातील त्यांचे नाव, आवाज, विशिष्ट पद्धती, ट्रेडमार्क संवाद खामोश आणि व्यक्तिरेखा व्यावसायिक फायद्यासाठी पूर्वपरवानगीशिवाय वापरणाऱ्या संस्थेविरुद्ध कायमस्वरूपी मनाई आदेश देण्याचीदेखील मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news