Ajit Pawar Plane Crash Black Box: ‘ब्लॅक बॉक्स सुरक्षित, पण राजकारण्यांपासून असुरक्षित?’ – रोहित पवारांचा घातपाताचा संशय कायम

अजित पवारांच्या विमान अपघातावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र; ब्लॅक बॉक्सच्या नुकसानीवरून प्रश्नचिन्ह
Ajit Pawar Plane Crash Black Box
Ajit Pawar Plane Crash Black BoxPudhari
Published on
Updated on

मुंबई : पाऊस, ऊन, बॉम्बस्फोट आणि आगीपासून सुरक्षित राहणारा विमानातील ब्लॅक बॉक्स हा राजकारण्यांपासून मात्र असुरक्षित आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपावरून अजित पवार यांच्या विमानाला घातपात झाल्याचा संशय आणखी गडद केला आहे.

Ajit Pawar Plane Crash Black Box
Muslim SEBC Reservation: मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा महत्त्वाचा निर्णय

अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत अनेक शंका घेतल्या जात आहेत. अशा स्थितीत ब्लॅक बॉक्स आणि रेकॉर्डरचे अपघातानंतर विमानाला लागलेल्या आगीत नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठविण्यात आल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स राजकारण्यांपासून असुरक्षित असल्याचे विधान केले आहे. विमानातील ब्लॅक बॉक्सबाबत आता काय राजकारण चालले आहे, हे आपल्याला बघावे लागेल. त्याच्या खोलामध्येही जावे लागेल, असे आ. रोहित पवार यांनी सांगितले.

Ajit Pawar Plane Crash Black Box
Shetkari Karjmafi: कर्जमाफीसाठी अपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर; नाव कसे तपासायचे? कागदपत्रे कुठे जमा करायची?

अजित पवार, जयंत पाटील अनेकवेळा भेटले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत अजित पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा करत होते. विशेषतः जयंत पाटील यांना ते नेहमी भेटायचे. गेल्या दीड वर्षामधील सीसीटीव्ही चित्रीकरण काढून तपासा म्हणजे अजित पवार हे जयंत पाटील यांना कितीवेळा भेटले हे कळेल, असेही आ. रोहित पवार म्हणाले.

Ajit Pawar Plane Crash Black Box
India France Mumbai Summit: मुंबईतील शिखर परिषदेत हॅमर क्षेपणास्त्रांसह भारत-फ्रान्सचे 21 करार

‌‘दाल में कुछ काला है‌’ : काँग्रेस नेते आ. वडेट्टीवार

काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी गंभीर शंका व्यक्त केली आहे. अजित पवार यांचा मृत्यू अपघाती वाटत नाही. या घटनेत काहीतरी संशयास्पद आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडल्यामुळे त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ब्लॅक बॉक्स जळाल्याचा अर्थ ‌‘दाल में कुछ काला है‌’ असेच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया आ. वडेट्टीवार यांनी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news