Sharad Pawar Retirement News: शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार? सुप्रिया सुळे संतापल्या; म्हणाल्या, ‘निवृत्तीचा निर्णय...’

Sharad Pawar Retirement News: शरद पवार राजकारणातून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहे.
Sharad Pawar Retirement News
Sharad Pawar Retirement NewsPudhari
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar Retirement News: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर पक्षाने भाजपप्रणित एनडीएमध्ये सहभागी व्हावे, अशी चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांना स्पष्ट शब्दांत उत्तर दिले आहे. शरद पवार कोणत्याही परिस्थितीत निवृत्त होणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

एका वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीबाबत बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीत पक्षातील काही नेत्यांकडून भाजपसोबत जाण्याच्या पर्यायावर चर्चा सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, सुप्रिया सुळे यांनी हे वृत्त फेटाळून लावत अशा बातम्या संतापजनक असल्याचे म्हटले आहे.

‘राज्यसभेचा अजून पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी’

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जाणे योग्य नाही, असे त्या म्हणाल्या.

शरद पवार यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा अजून पाच वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. मग ते निवृत्त कसे होतील? कोण राजकारणातून निवृत्त व्हायचे, हे काही मोजके लोक ठरवणार नाहीत. त्याचा निर्णय जनता घेईल, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडली. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीतील राजकीय हालचालींबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar Retirement News
Video Viral: 'बाई वाड्यावर या', गोव्यात रशियन तरुणीसोबत महाराष्ट्रातील पुरुषांचा भन्नाट डान्स; व्हिडिओ व्हायरल होताच कमेंट्सचा पाऊस

शरद पवारांच्या निवृत्तीमागे भाजपसोबत जाण्याचा फॉर्म्युला?

शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीची चर्चा नेमकी कशामुळे सुरू झाली, याबाबतही वेगवेगळे दावे केले जात आहेत. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात भाजपसोबत जाण्याच्या शक्यतेवर विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले होते.

शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी आधी राजकारणातून निवृत्ती घ्यावी आणि त्यानंतर सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह पक्षातील इतर नेत्यांनी एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घ्यावा, असा पर्याय पुढे आल्याचे वृत्तात म्हटले होते.

याशिवाय, पक्षातील काही नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी याबाबत चर्चा केल्याचाही दावा करण्यात आला होता. मात्र, या सर्व चर्चा वृत्तसंस्थेच्या सूत्रांवर आधारित आहेत. त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Sharad Pawar Retirement News
Ramayana Movie Controversy: रामायण चित्रपटावरून वाद पेटला! निर्माते-दिग्दर्शकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल; आंदोलनाचा इशारा

मोदींच्या फोनमुळे चर्चा

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चेला आणखी एक कारण ठरले होते. काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

या संभाषणादरम्यान मोदी यांनी, 'आपण विश्रांती घ्या, सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू,' असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. मोदी यांनी हे विधान पवार यांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी केले असले, तरी राजकीय वर्तुळात त्याचे वेगवेगळे अर्थ काढले गेले.

या विधानाचा संबंध शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीशी जोडला जाऊ लागला. त्यानंतर त्यांच्या निवृत्तीबाबतच्या चर्चांना अधिक वेग आला. मात्र सुप्रिया सुळे यांनी हे दावे फेटाळले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.