Sharad Pawar: राज्यसभा निवडणुकीनंतर शरद पवार भावुक; जनतेच्या विश्वासामुळेच राजकीय प्रवास शक्य

1967 पासूनचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास आठवत पवारांचे समाजमाध्यमावर मनोगत; सहा वर्षांच्या नव्या संधीबद्दल आभार
sharad pawar
पुतळ्यात भ्रष्टाचार करणार्‍यांवर विश्वास कसा ठेवायचा? शरद पवार यांचा सवालPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : राज्यसभा निवडणूक बिनविरोधनंतर शरद पवार हे भावुक झाले असून, जनतेच्या विश्वासामुळेच माझा प्रदीर्घ राजकीय प्रवास होऊ शकला, अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावर मांडली आहे.

sharad pawar
Mumbai Restaurant Gas Supply: आखाती युद्धाचा परिणाम मुंबईत; हॉटेल्सचा गॅस पुरवठा खंडित

1967 पासून लोकप्रतिनिधी म्हणून सुरू झालेला आपला प्रवास आजपर्यंत अखंडपणे सुरू आहे. हा प्रवास वैयक्तिक नसून, महाराष्ट्राच्या जनतेचा आहे. कारण, त्यांच्या विश्वासामुळेच हा प्रवास पुढे सुरू ठेवणे शक्य झाले. 1967 मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर सार्वजनिक जीवनात सातत्याने काम करत असताना राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. केंद्र सरकारमध्ये संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषिमंत्री म्हणूनही काम करण्याची जबाबदारी सांभाळली, असे त्यांनी म्हटले आहे.

sharad pawar
Jogeshwari MD Drugs: जोगेश्वरीत 40 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; फ्लॅटवर छापा टाकून आरोपी अटकेत

या सर्व पदांवर काम करताना महाराष्ट्र आणि देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच सर्वांत मोठे बळ राहिले आहे. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन मोठा विश्वास दाखवला असल्याचे सांगत शरद पवार यांनी जनतेसह मित्रपक्षांचेही आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news