Jogeshwari MD Drugs: जोगेश्वरीत 40 लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; फ्लॅटवर छापा टाकून आरोपी अटकेत

डी.एन. नगर पोलिसांची कारवाई; 800 ग्रॅम एमडी ड्रग्जसह फौजानअली तिकिटवाला अटक, मुख्य आरोपी जुनैद फरार
Jogeshwari MD Drugs
Jogeshwari MD DrugsPudhari
Published on
Updated on

मुंबई : जोगेश्वरीतील एका फ्लॅटमध्ये डी. एन नगर पोलिसांच्या एका विशेष पथकाने कारवाई करुन 800 ग्रॅम वजनाचे सुमारे 40 लाखांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. विक्रीसाठी ड्रग्ज घरी ठेवणाऱ्या फौजानअली अहमद तिकिटवाला या 33 वर्षांच्या आरोपीस पोलिसांनी अटक केली.

Jogeshwari MD Drugs
Jamkhed MD Drugs Seizure: जामखेडमध्ये ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; ग्रामीण भागात अमली पदार्थांचे जाळे

त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याचा मित्र जुनैद याला पोलिसांनी पाहिजे आरोपी दाखविले असून तोच या ड्रग्ज कटातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. जोगेश्वरी येथे राहणाऱ्या फौजानअलीकडे एमडी ड्रग्जचा साठा असून त्याची तो विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Jogeshwari MD Drugs
Sion Railway Flyover Work: सायन रेल्वे उड्डाणपुलाचे काम पुन्हा लांबले; पूर्णत्वाची नवी मुदत 15 ऑगस्ट

या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मचिंदर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक गितांजली बाबर, एपीआय सुनीत घाडगे, पोलीस अंमलदार संजय हळदे, बिपीन गायकवाड, विनोद गायकवाड, मंगेश चव्हाण, रांजणे, बाबर, पांढरे, प्रधान, चंद्रकला गारे याीं मेमन कॉलनीतील फौजानअलीच्या घरी छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी 40 लाखांचा 800 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते.

Jogeshwari MD Drugs
Mumbai Hawkers: मुंबईतील फेरीवाल्यांना तात्पुरत्या जागा देण्याचे संकेत; उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा

ड्रग्जविक्रीतून मिळत होते कमिशन

चौकशीत त्याला ते ड्रग्ज जुनैद नावाच्या त्याच्या मित्राने दिले होते. तो त्याच्यासाठी एमडी ड्रग्जची विक्री करत होता. या विक्रीतून आलेली रक्कम त्याला पाठवत होता. त्यासाठी त्याला प्रत्येक कामासाठी ठराविक रकमेचे कमिशन मिळत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात रात्री उशिरा फौजानअलीला पोलिसांनी अटक केली, तर जुनैदचा पोलीस शोध घेत आहेत. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी अंधेरीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news