Shakeel Noorani Arrest: ‘जोरू का गुलाम’चे दिग्दर्शक शकील नूरानीला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक

चित्रपटाच्या चर्चेच्या बहाण्याने घरी बोलावून नशेचे पदार्थ दिल्याचा अभिनेत्रीचा आरोप; कथित व्हिडीओद्वारे धमकावल्याचेही तक्रारीत नमूद
Shakeel Noorani Arrest
Shakeel Noorani ArrestPudhari
Published on
Updated on

मुंबई: ‘जोरू का गुलाम’ या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूरानी (७३) यांना ३३ वर्षीय अभिनेत्रीने केलेल्या बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. नूरानी यांना न्यायालयाने १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

बडे दिलवाला (१९९९) आणि गोविंदा-ट्विंकल खन्ना अभिनित जोरू का गुलाम (२०००) या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेले शकील नूरानी हे हिंदी चित्रपटसृष्टीत लेखक आणि निर्माते म्हणूनही परिचित आहेत.

संबंधित अभिनेत्रीची नूरानी यांच्याशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. आगामी चित्रपटाच्या प्रकल्पावर चर्चा करण्याच्या बहाण्याने नूरानी यांनी तिला मालवणीतील घरी बोलावल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे. घरी गेल्यानंतर नूरानी यांनी तिला नशेचे पदार्थ दिले.

Shakeel Noorani Arrest
Maharashtra Politics: शरद पवार गट इंडिया आघाडीतच; मोदींच्या भेटीवरून उबाठा-काँग्रेसमध्ये मतभेद

त्यानंतर ती बेशुद्ध झाली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच तिचा कथित व्हिडीओ तयार करून तो पोलिसांकडे किंवा कुटुंबीयांकडे गेल्यास प्रसारित करण्याची धमकी दिल्याचाही आरोप तिने केला आहे.

Shakeel Noorani Arrest
Cyber Crime: ७.४२ कोटींच्या फसवणुकीच्या देशभरातून ४२ तक्रारी दाखल; सायबर फसवणुकीसाठी बँक खाती देणारे रॅकेट उघड

साताऱ्यात फार्महाऊसमधून अटक

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी नूरानी यांचा शोध घेतला. ते सातारा जिल्ह्यातील मेढा परिसरातील फार्महाऊसमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथून मालवणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोठडीत असलेल्या नुरानीकडून कथित व्हिडीओ आणि इतर पुराव्यांचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news