School Timetable : नव्या अभ्यासक्रमानुसार तिसरी ते आठवीचे वेळापत्रक जाहीर

⁠शैक्षणिक वर्षातील दिवसांचे नियोजन; दैनिक पुढारीच्या वृत्ताची दखल
School Timetable
नव्या अभ्यासक्रमानुसार तिसरी ते आठवीचे वेळापत्रक जाहीरpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा आणि राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या अनुषंगाने इयत्ता तिसरी ते आठवीसाठी विषयनिहाय तासिका विभागणी व शालेय वेळेचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)ने याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले असून आगामी शैक्षणिक वर्षात शाळांना त्यानुसार वेळापत्रक तयार करावे लागणार आहे.

नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू असताना वेळापत्रक नसल्याबाबत ‘दैनिक पुढारी’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर तत्काळ हालचाली झाल्या आणि शुक्रवारी सायंकाळी नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

School Timetable
ITI Admission 2026 : आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रक कधी?

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि कार्यशिक्षण यांसाठी स्वतंत्र तासिका निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रंथालय उपक्रम, अतिरिक्त समृद्धीकरण तासिका (एईपी) आणि मूल्याधिष्ठित उपक्रमांनाही स्थान देण्यात आले आहे.

शाळांनी घंटानियोजन स्थानिक गरजांनुसार करावे; मात्र साप्ताहिक अध्यापनासाठी निश्चित केलेल्या तासिकांमध्ये कपात करता येणार नाही. सात तासांच्या आणि दोन सत्रांत चालणाऱ्या शाळांसाठी स्वतंत्र वेळापत्रक नमुनेही देण्यात आले आहेत.

School Timetable
Maharashtra TET Exam 2026: महाराष्ट्र TET परीक्षा आता 28 जूनला; तारखेत बदल जाहीर

राज्यातील मराठी, इंग्रजी तसेच इतर माध्यमांच्या शाळांसाठी विषययोजनाही निश्चित करण्यात आली आहे. तिसरी ते पाचवीमध्ये मातृभाषा, इंग्रजी, गणित, आपल्या सभोवतालचे जग, कलाशिक्षण, शारीरिक शिक्षण व कार्यशिक्षणावर भर देण्यात आला आहे.

तिसरी ते पाचवी : प्रमुख विषयांसाठी सा. तासिका

विषय- सा. तासिका

भाषा (आर-१)-६

भाषा (आर-२)-६

भाषा (आर-३)- ४ ते ५

गणित- ७

आ. सभोवतालचे जग-१ -४

आ. सभोवतालचे जग- २ -४

कलाशिक्षण-४

शा. शिक्षण व निरामयता-४

कार्यशिक्षण-४

सहावी ते आठवी : प्रमुख विषयांसाठी सा. तासिका

विषय - सा. तासिका

भाषा (आर-१) -६

भाषा (आर-२) -४

भाषा (आर-३) - ४

गणित - ६

विज्ञान - ६

सामाजिक शास्त्रे- ६

कलाशिक्षण- ४

शा. शिक्षण व निरामयता- ४

कार्यशिक्षण -४

अति. समृद्धीकरण तासिका - १

२१० दिवस अध्यापन-अध्ययनासाठी राखीव

सहावी ते आठवीमध्ये विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे हे स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. शालेय कामकाजाचेही नियोजन निश्चित करण्यात आले असून वर्षातील २३७ कामकाजाच्या दिवसांपैकी २१० दिवस अध्यापन-अध्ययनासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. परीक्षा, मूल्यमापन, सहशालेय उपक्रम आणि शैक्षणिक सहलींसाठी स्वतंत्र दिवस निश्चित करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news