Satish Waghole MPSC Chairman: एमपीएससी अध्यक्षपदाचा कार्यभार वाघोलेंकडे; राज्यपालांकडून आदेश जारी

अध्यक्ष विवेक भीमनवार स्वेच्छा रजेवर; पेपरफुटी आणि परीक्षांतील गैरप्रकारांवरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर महत्त्वाचा निर्णय
Satish Waghole MPSC Chairman
Satish Waghole MPSC ChairmanPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या तसेच संसदीय कार्य विभागाचे निवृत्त सचिव सतीश बबन वाघोले यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वाघोले हे आयाेगाचे विद्यमान सदस्य आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकाराच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन छेडल्यानंतर राज्य सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन करताच आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार स्वेच्छा रजेवर गेले.

Satish Waghole MPSC Chairman
Naxalite leader Venugopal | जनतेला, केडरला खोटी आशा दाखवणे चूक होते; जगभरात सशस्त्र लढे अपयशी ठरताहेत

त्यामुळे अध्यक्षपदाचा कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या शिफारसीनुसार वाघोले यांच्या प्रभारी नियुक्तीचे आदेश राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी जारी केले.

वाघोले गेल्या सप्टेंबरमध्येच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सदस्य म्हणून दाखल झाले. निवृत्तीनंतर चारच महिन्यांत त्यांना ही संधी मिळाली. ७ सप्टेंबरला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून भीमनवार यांनीच गोपनीयतेची शपथ दिली होती. आता एका महिन्यानंतर मात्र परिस्थिती बदलली व अध्यक्ष भिमनवार स्वेच्छा रजेवर, तर सदस्य वाघोले अध्यक्षपदी आले.

Satish Waghole MPSC Chairman
MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी ५ सदस्यीय समितीची गठीत, माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले अध्यक्ष, तुकाराम मुंढे सदस्य सचिव

एलएलएम असलेले सतीश वाघोले यांनी पुणे सत्र न्यायालयात काही काळ वकिली केली. पुढे एमपीएससी होऊन ते मंत्रालयात विधी व न्याय विभागाचे अव्‍वर सचिव झाले. नंतर सहसचिवही झाले. २०२१ पासून एप्रिल २०२६ पर्यंत ते विधी-न्याय व संसदीय विभागचे सचिव होते.

भिमनवार स्वेच्छा रजेवर गेल्यानंतर आयोगाची अवस्था निर्नायकी असताना बुधवारी आयोगाने अचानक जुन्या उत्तरपत्रिकांसह कागदपत्रांची रद्दी विकायला काढली आणि वाद ओढवून घेतला. पुढारीने हे वृत्त देताच ही निविदा दुसऱ्याच .दिवशी रद्द झाली. मात्र, असे गोंधळ पुन्हा नको म्हणून राज्य सरकारने अध्यक्षपदाची खुर्ची रिकामी ठेवायला नको, अशी भूमिका घेतली असावी. त्यानुसार वाघोले यांच्याकडे या पदाचा कार्यभार दिला गेल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news