

Sanjay Raut On BMC Election Voting: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अन् खासदार संजय राऊत यांनी आज (दि. १५ जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत बोगस मतदान करणाऱ्यांना गर्भित इशारा दिला. त्यांनी आमचे कार्यकर्ते प्रत्येत मतदान केंद्राबाहेर तैनात असल्याचं सांगितलं. तसंच आता मराठी माणूस जागा झाला आहे. तो मुंबईसाठी आणि मराठीसाठी मतदान करणार आहे असं देखील सांगितलं.
संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, 'मुंबईत काय होणार याकडे फक्त राज्याचं देशाचं नाही तर जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. मुंबईवर कोणाचा ताबा किंवा कोण जिंकेल यांचे डोनाल्ड ट्रम्प यांचे देखील लक्ष असेल. मुंबईची लढाई फक्त निवडणुकीपर्यंत नाही. केंद्राची सत्ता आणि महाराष्ट्रद्रोही सत्ता याविरूद्ध ही लढाई आहे. अन् मतदान ही त्याची एक पहिली पायरी आहे. महापालिका जिंकल्यानंतर पुन्हा लढाईला सुरूवात होणार आहे. ही लढाई भाजपची राक्षसी भूक आणि त्यांना पोसणाऱ्या उद्योगपतींच्या विरूद्ध आहे.
संजय राऊत यांनी पैसे वाटपवारून राज्यात होत असलेल्या राडेबाजीवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, 'आता पैसे वाटपवारून जे राडे होत आहेत त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. मात्र हे राडे आमचे लोक करत नाहीयेत. जर आमचे लोक करत असते तर आतापर्यंत मकोका लावला असता. हा हरामाचा पैसा आहे. भाजपची अन् शिंदेंची आपापसात मारामारी करत आहेत. अजित पवार भाजपचे कपडे फाडत आहेत.'
बोगस मतदानाचा प्रयत्न झाल्यात त्यांना ठोकून काढून असं देखील संजय राऊत यांनी सुचित केलं. ते म्हणाले, 'बोगस मतदान रोखण्यासाठी आमची राडेबाज फौज तैनात आहे. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर आमचा भगवा स्क्वाड दृष्य अन् अदृष्य पद्धतीनं कार्यरत आहे.'
संजय राऊत यांनी आम्ही कायदेशी राडेबाजी करणार असं सांगितलं. ते म्हणाले आम्ही कायदेशीर राडा करणार आहोत. यात कायदा आडवा येणार नाही. आम्ही कायद्याच्या रक्षणाचंच काम करत आहोत. आमची पथके तयार आहेत.
राऊत यांनी पाडू मशिनबाबत देखील मत व्यक्त केलं. 'पाडू मशिन हे अपवादात्मक परिस्थितीत जोडलं जाणार असं ते म्हणत आहेत. मग ही अपवादात्मक परिस्थिती लोकसभेला का नव्हती. विधानसभेला का नव्हती. देशात इतरत्र का नाही. हे मशिन फक्त मुंबईतच का अशी अपवादात्मक परिस्थिती राज्यात इतर ठिकाणी का निर्माण होणार नाही. याची खात्री काय हे फक्त मुंबईतच का? अशी प्रश्नांची सरबत्ती केली.