Sanjay Raut: प्रवक्त्यांच्या फौजा.. युती अमुक तमुक.. फरक पडणार नसेल तर तोंडाची डबडी वाजवता कशाला.. राऊतांनी वर्मावर बोट ठेवलं

भाजप नेत्याने सीमाप्रश्न किंवा अखंड महाराष्ट्रासाठी आवाज उठवला नाही, उलट महाराष्ट्र तोडून 'वेगळा विदर्भ' करण्याची भाषा बावनकुळे करत आहेत.
Sanjay Raut
Sanjay Rautpudhari photo
Published on
Updated on

Sanjay Raut Slams BJP Shinde Sena Spokespersons: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप अन् शिवसेना शिंदे गटांच्या नेत्यांवर आज टीकास्त्र सोडलं. त्यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा झाल्यावर भाजप नेते अन् शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. आजच्या (दि. २५ डिसेंबर) पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी जर ठाकरे बंधूच्या युतीने काही फरक पडणार नसेल तर मग इतके प्रवक्ते घेऊन त्याच्यावर भाष्य का करता असा सवाल केला.

Sanjay Raut
Sanjay Raut: स्टेज सोडून चाललेल्या राऊतांचा राज ठाकरेंनी हात धरला अन्.... ठाकरे कुटुंब- संजय राऊत जिव्हाळ्याचा Video एकदा बघाच

संजय राऊत भाजप अन् शिंदे गटाच्या टीकेवर पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, 'ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे काही फरक पडणार नसेल तर मग तोंडाची डबडी वाजवता कशाला. सगळेच अगदी काल दिवसभर त्यांचे प्रवक्त्यांच्या फौजा घेऊन युती कशी अमुक आहे.. तमुक आहे.. वगैरे बोलत होते. त्याची गरज नाही ना सोडून द्या ना तुम्ही. आपण 16 तारखेला याच्यावर चर्चा करू.'

Sanjay Raut
Sanjay Raut: 'ठाकरे बंधुंची युती झालेलीच आहे, फक्त जागावाटप...'; संजय राऊत काय म्हणाले?

ठाकरे बंधूंचे ऐक्य ही भाजपची पोटदुखी

राऊत पुढे म्हणाले की, ठाकरे एकत्र आल्यामुळे विरोधकांच्या फौजांना कामाला लागावे लागले आहे. मुंबई महाराष्ट्रात राहिली ती ठाकरेंच्या संघर्षामुळेच, नाहीतर भाजपने मुंबईचे तुकडे पाडून अदानींच्या घशात घातली असती.

संजय राऊत भाजपच्या मराठी प्रेमावर बोलताना म्हणाले, 'भाजपने किंवा देवेंद्र फडणवीसांनी मराठी माणसासाठी काय केले? गोपीनाथ मुंडे यांचा अपवाद सोडला तर एकाही भाजप नेत्याने सीमाप्रश्न किंवा अखंड महाराष्ट्रासाठी आवाज उठवला नाही, उलट महाराष्ट्र तोडून 'वेगळा विदर्भ' करण्याची भाषा बावनकुळे करत आहेत.'

Sanjay Raut
Uddhav Thackeray: आता जर चुकलात तर संपाल.... पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंची भावनिक साद

भाजपनं पिंजरे लावले आहेत

एकनाथ शिंदे यांच्या 'मुलं पळवणारी टोळी' या विधानाचा समाचार घेताना राऊत म्हणाले की, ज्यांनी स्वतःचा पक्ष आणि बाप चोरला आहे, त्यांनी आम्हाला शिकवू नये. भाजपने कुत्रे पकडण्यासारखे पिंजरे लावले आहेत, त्यात शिंदे गटाची किती माणसं अडकतात हे महापालिकेनंतर दिसेल.

Sanjay Raut
Raj Thackeray: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार; पत्रकार परिषदेत राज ठाकरेंची घोषणा

हिंदूत्वाबाबत खडे बोल

"स्वातंत्र्य लढ्यात तुमचे वैचारिक पूर्वज कुठे होते?" असा सवाल करत राऊत यांनी फडणवीसांना लक्ष केले. मुस्लीम क्रांतिकारकांनी फासावर जाताना वंदे मातरम म्हटले, पण भाजपला राजकीय गरजेपोटी आता या शब्दाची आठवण झाली आहे. राऊत यांनी काँग्रेसबोतच्या जागा वाटपाबाबत देखील भाष्य केलं.

ते म्हणाले, वर्षा गायकवाड आणि काँग्रेसशी आमची चर्चा सुरू आहे. मुंबईतील जागावाटप 'जिंकून येण्याच्या क्षमतेवर' (Electability) ठरेल. कुणीही जागा अडवून धरू नये.

Sanjay Raut
Raj Thackeray | उत्तर देवांना द्यावे, दानवांना नाही : राज ठाकरेंनी भाजपला डिवचलं

मोदींनाही सोडलं नाही

पंतप्रधान ख्रिसमसनिमित्त चर्चमध्ये जातात आणि तिकडे त्यांचेच लोक युपीमध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घालतात, हा कोणता दुटप्पीपणा आहे? असा सवाल संजय राऊत त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news