Raj Thackeray: मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार; पत्रकार परिषदेत राज ठाकरेंची घोषणा

Raj Thackeray Uddhav Thackeray Updates: मुंबईचा महापौर मराठीच आणि आमचाच असेल, अशी ठाम घोषणा राज ठाकरे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा राजकीय अंत होईल, असा इशारा दिला.
Raj Thackeray
Raj Thackeray Pudhari
Published on
Updated on

Mumbai Mayor Will Be Marathi and Ours Say's Raj Thackeray: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी थेट शब्दांत सांगितलं की, “मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार.” या विधानानंतर कार्यक्रमस्थळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनीही मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा संदर्भ देत मराठी माणसाच्या संघर्षाची आठवण करून दिली. मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी मराठी माणसाने मोठं बलिदान दिलं असून, आज ठाकरे बंधू एकत्र बसले आहेत, हे त्याच इतिहासाचं प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार ठाकरे हे पहिल्या पाच सेनापतींपैकी एक होते, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाने त्या काळात मुंबईसाठी संघर्ष केला, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Raj Thackeray
Amol Mitkari: अमोल मिटकरींची प्रशांत जगताप यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका; पोस्ट करत लिहिलं, 'उपटसुंभाचा पीळ...'

मुंबईला वेगळं करण्याचा, अथवा मराठी माणसाला या शहरापासून दूर करण्याचा प्रयत्न कोणी केला, तर त्याला संपविल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला. “शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो आहोत,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी युती ही केवळ निवडणुकांसाठी नसून, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी असल्याचं अधोरेखित केलं.

Raj Thackeray
Raj- Uddhav Thackeray Live: युतीची घोषणा पण जागा वाटपाचं काय?; ठाकरे बंधूंच्या 12 मिनिटांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

भूतकाळातील राजकीय फूट आणि अपप्रचाराचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला थेट आवाहन केलं. “आता चुकण्याची वेळ नाही. जर पुन्हा फूट पडली, तर मोठं नुकसान होईल. तुटू नका, फुटू नका आणि मराठीपणाचा वारसा टाकू नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. या युतीच्या माध्यमातून एकजूट दाखवण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांची महापौराबाबतची घोषणा आणि उद्धव ठाकरे यांचा आक्रमक निर्धार, यामुळे आगामी महापालिका निवडणुकांआधीच मुंबईचं राजकारण तापलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news