Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा? संजय राऊत म्हणाले, ‘जंतर-मंतरवर...’

Sanjay Raut On Cockroach Janta Party Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Raut Cockroach Janta Party
Sanjay Raut Cockroach Janta PartyPudhari
Published on
Updated on

Sanjay Raut On Cockroach Janta Party Protest: दिल्लीतील जंतर-मंतर येथे 6 जून रोजी होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाची देशभरात चर्चा सुरू असतानाच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या आंदोलनाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनाला थेट पाठिंबा जाहीर न करताही त्यांनी अशा चळवळींना शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासह विविध मुद्द्यांवर आंदोलनाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना कॉकरोच जनता पार्टीला शिवसेनेचा पाठिंबा आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष किंवा संघटना आहे, ती एक चळवळ आहे. देशातील विविध प्रश्नांबाबत चिंता व्यक्त करणारे अनेक लोक कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसतात. तरीही ते सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांवर आवाज उठवत असतात.

Sanjay Raut Cockroach Janta Party
CJP Spokesperson: मोठी राजकीय खेळी! कॉकरोच जनता पार्टीने जाहीर केले तीन नवे चेहरे; आंदोलनासाठी नवी टीम मैदानात

ते पुढे म्हणाले की, देशासमोर सध्या अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. अशा वेळी राष्ट्रहितासाठी काही लोक एकत्र येऊन आंदोलन करत असतील, तर त्यांचे स्वागत केले पाहिजे. देश वाचवण्याची आणि लोकशाही बळकट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने अशा चळवळींना शुभेच्छा द्यायला हव्यात, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी संजय राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचाही उल्लेख केला. 2014 पूर्वी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून देशभरात मोठी जनजागृती झाली होती, याची आठवण करून देत त्यांनी अण्णा हजारेंना थेट आवाहन केले.

Sanjay Raut Cockroach Janta Party
Lalit Modi Claims: 'सोनिया गांधी शशी थरुरला...', ललित मोदींचा खळबळजनक दावा, 16 वर्षांपूर्वीचे सिक्रेट केलं उघड

"अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीतून बाहेर पडावं आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर जाऊन या तरुणांना आशीर्वाद द्यावा. देशातील तरुण एखाद्या प्रश्नावर एकत्र येत असतील, तर त्यांना प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे," असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, 6 जून रोजी होणाऱ्या आंदोलनाकडे आता राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे. कॉकरोच जनता पार्टी ही डिजिटल माध्यमातून उदयास आलेली चळवळ असून अल्पावधीतच तिने मोठ्या प्रमाणात तरुणांचे लक्ष वेधून घेतले आहे. या आंदोलनाला विविध स्तरातून मिळणाऱ्या प्रतिक्रिया आणि त्याचा पुढील राजकीय परिणाम याबाबत उत्सुकता वाढली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news