ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा एलॉन मस्क यांचाही आरोप : संजय राऊत

ईव्हीएम हॅक होऊ शकतं हा एलॉन मस्क यांचाही आरोप : संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात जिथं पराभव दिसत होता तिथं घोटाळे करून ४५ जागांचे निकाल लावले. इव्हीएम हॅक होऊ शकतं आणि मोबाईलच्या माध्यमातून हॅक करता येत, असे टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. लोकसभा निकाल घोटाळ्यातील उत्तर पश्चिममधील आदर्श घोटाळा आहे. संपूर्ण निकाल रहस्यमय आणि संशयास्पद आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने रविंद्र वायकरांना शपथ घेण्यापासून रोखले पाहिजे, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सोमवारी माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी रविंद्र वायकरांच्या विजयाच्या घोटाळ्यात वंदना सूर्यवंशींचा मोठा हात आहे. सूर्यवंशी आणि त्यांच्या नातेवाईकांचे फोन ताब्यात घ्यावेत. उत्तर पश्चिम मधील निवडणूक अधिकाऱ्यांचा इतिहास तपासला पाहिजे, अशी मागणी केली आहे. वायकरांच्या नातेवाईंकांचे फोन जप्त केल्यावर वाईकरांचा जवळचा माणूस असलेला पोलिस अधिकारी वनराई पोलीस स्टेशमध्ये का येत होता? असा सवाल करत राऊत म्हणाले, जप्त केलेला फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवल्याचे सांगितले जाते, पण रक्ताचे नमूने बदलून गुन्हेगाराला वाचवलं जातं तिथं फोनच काय होणार? या सर्व लॅबचे प्रमुख केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यांनीच उत्तर पश्चिमचा निकाल चोरल्याचा आरोप राऊत यांनी केला.

पोलीस स्टेशनचे पीआय अचानक रजेवर का गेले?

वनराई पोलीस स्टेशनचे पीआय राजभर अचानक रजेवर का गेले? असा सवाल करत राऊत यांनी पोलीस स्टेशनच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वायकर यांना विजयी करणारा मोबाईल फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न झाला. वायकर यांचा खास माणूस जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते ते निवृत्त पीआय सातारकर हे वनराई पोलीस स्टेशनमध्ये चार दिवसांपासून काय डील करत होते? वनराई पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज लगेच जप्त करुन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news