मुंबई : [author title="दिलीप सपाटे" image="http://"][/author]
लोकसभा निवडणुकीत ४५ प्लसची घोषणा देणाऱ्या महायुतीला मानहानीदायक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यातही राज्यात आपल्या घटक पक्षांपेक्षा कायम चांगला स्ट्राईक रेट राखणाऱ्या भाजपचीही कामगिरी घसरली. २८ जागा लढवून भाजपला फक्त ९ जागांवर विजय मिळविता आला. १९ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यामुळे हा पराभव महायुतीच्या जिव्हारी लागणारा तर आहेच; पण तो येणारी विधानसभा निवडणूक पाहता, महायुतीच्या नेत्यांची जास्त चिंता वाढविणारा आहे.
महायुतीने मोदी संविधान बदलणार, हे विरोधकांनी सेट केलेले नरेठिया बदलण्याचा खूप प्रयत्न केला; पण त्याला फारसे यश आले नाही. त्यातच मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्दधाने, तर उत्तर महाराष्ट्रात कांद्याने महायुतीच्या डोळ्यात पाणी आणले. पश्चिम महाराष्ट्राने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि कॉग्रेसला साथ दिली. त्यामुळे महायुतीला अपेक्षित निकाल आले नाहीत. ठाकरे यांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणने यावेली महायुतीला साथ दिली. त्याने महायुतीला थोडा दिलासा मिळाला. आता हे निकाल पाहता, महायुतीपुढे सर्वात मोठे आव्हान परेटिव्ह बदलण्याचे आहे. हे आव्हान लक्षात आल्याने भाजपने त्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे.
प्रकपनि सामोरे आला, तीन प्रमुख पक्ष एकत्र आले, त्यांचे नेते सोक्त बस् लागले तरी खाली कार्यकर्ते एकत्र आले नाहीत. निवडणुकीपूर्वी तिन्ही पक्षांचे मुंबईत एकत्र मिळावे झाले; परंतु राज्यात असे मिळावे होऊ शकले नाहीत, या मेळाव्याचे नियोजन करता करताच निवडणूक आली आणि त्यानंतर महायुतीच्या नेत्यांच्चा बराचसा वेळ कार्यकत्यांत समन्वय साधण्याऐवजी जागा वाटपाच्या
चर्चेतच गेला. ही चूक फडणवीस यांच्या निदर्शनास आली असून, नजीकच्या काळात महायुतीतील पक्ष कार्यकर्त्यांच्या समन्वधावर भर देण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. लोकसभेत झालेला पराभव पाहता, महायुतीला चुका दुरुस्त करायला आणि मतदारांना आपल्याकडे
बळवण्यासाठी अवघ्या तीन साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. कमी षटकात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना जास्त धावा काढायच्या आहेत. एक-दोन धावा नाही; तर त्यांना षटकार, चौकार खेचावे लागणार आहेत. या तिघांच्या रणनीतीवरच महायुतीचे विधानसभेचे यशापयश अवलंबून आहे.
विरोधकांनी केलेला अपप्रचार पुसून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. केवळ पराभवाचे विश्लेषण न करता, गांभीयनि आत्मचिंतन करून आतापासून लोकसभेतील निकाल उलटविण्यासाठी कंबर कसण्यास सांगितले आहे. त्यामुळे पराभवातून सावरत भाजप लगेच सक्रिय झाला आहे. भाजपला केंद्रात स्वबळावर सत्ता मिळाली नाही. त्याला महाराष्ट्रातील अपयशही कारणीभूत ठरले, विधानसभेत या पराभवाचे उट्टे फाडून पक्षश्रेष्ठींची नाराजी दूर करण्याचा फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रयान राहणार आहे.
एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास वाढला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या निवडणुकीत तोलामोलाचे यश मिळाले आहे. त्वांनी १५ जागा लढवून ७ जागांवर विजय मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या खालोखाल त्यांचा स्ट्राईक रेट राहिला आहे. महायुतीत सर्वात चांगला स्ट्राईक रेट राखणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा आत्मविश्वास काहीसा बाढला आहे. शिवसेनेशी महारी करणारे पुन्हा निवडून येत नाहीत, हे आजवरचे समीकरण एकनाथ शिंदे पुसून काढण्यात काही प्रमाणात यशस्वी ठरले. त्यांचे चार विद्यमान खासदार निवडून आले आहेत. शिवसेनेच्या तिकीट वाटपात ते भाजपचा फारसा हस्तक्षेप सहन करणार नाहीत, असे संकेत आहेत.
अजित पवार यांना मात्र लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला. त्यांना सुनील तटकरे यांच्या रूपाने एवामेव जागेवर विजय मिळवता आला. शरद पवारांपासून फुटून अजित पवार यांच्यासोबत आलेल्या ४० आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. आधीच नीलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडत शरद पवार गटाकडून अहमदनगर लोकसभेची निवडणूक लढविली आणि ती जिंकली, त्यामुळे अन्य आमदारही अजित पवार गटात राहून आपले राजकीय भवितव्य सुरक्षित राहील का? या संभ्रमात आहेत. हे आव्हान अजित पचार वासे हाताळतात, यावर त्यांच्या पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.