Pradeep Purnekar Murder : पूर्णेकरांची हत्या राजकीय वैमनस्यातूनच, नव्‍याने जबाब नोंदवा; संजय राऊतांचे गृह मंत्रालयाला आवाहन

४ ऑक्टोबरच्या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डावे पक्ष सहभागी होतील
Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder
शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत.Pudhari.
Published on: 
Updated on: 

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder : शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या राजकीय वैमनस्यातूनच झाली आहे. हल्लेखोरांना मीनाक्षी शिंदे यांच्या घरी जाताना पाहिले आहे, हा आरोप आमचा नाही; त्यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. त्यांनी मीनाक्षी शिंदे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. आता या प्रकरणी नव्याने जबाब नोंदवावेत, असे आवाहन शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केले.

ठाण्याची अवस्था बीडपेक्षा भयंकर

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "प्रदीप पूर्णेकरांची हत्या हे एक राजकीय षड्यंत्र आहे. त्यांनी महानगरपालिकेची निवडणूक मीनाक्षी शिंदे यांच्याविरोधात लढवली होती. ठाण्याची अवस्था बीडपेक्षा भयंकर आहे. देवेंद्र फडणवीस यांना माहिती नसेल तर ते अपयशी गृहमंत्री आहेत."

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder
Pradeep Purnekar: वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाची पोस्ट… ‘पप्पा’; हजारोंच्या गर्दीत प्रदीप पूर्णेकरांना अखेरचा निरोप, जबाबात ‘त्या’ दोघांची नावे

दादागिरीचा अंत होतो, फार काळ चालत नाही

दादागिरीचा अंत होतो, फार काळ चालत नाही. हत्या प्रकरणी आम्ही आयुक्तांसह उपमहापौरांना पत्र लिहिले आहे. खुनाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. हे प्रकरण न्यायालयात टिकेल, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder
Pradeep Purnekar death case : पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर - मीनाक्षी शिंदे पतीसह सहआरोपी

४ ऑक्टोबरच्या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डावे पक्ष सहभागी होतील

मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मुंबईत ४ ऑक्टोबर रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तो एक गर्जना मोर्चा आहे. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डावे पक्ष सहभागी होतील. काँग्रेसचे नेते बोलतील, उद्धव ठाकरे बोलतील, असेही राऊत यांनी सांगितले.

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder
Sanjay Raut On NCP: मोदी बारामतीत येतात जातात.. कारखाना वगैरे विषय.. पवार तर मविआचे पिलर! राऊत NCP बाबत नेमकं काय म्हणाले?

काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, त्यानुसार धोरण ठरवतील

काँग्रेस पक्ष हा या देशातील एक राष्ट्रीय पक्ष आहे. त्यानुसार ते धोरण ठरवतील आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन करतील. कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन हे शिवाजी पार्कवर आहे. १९९७ नंतर जन्मलेले 'जेन झी' (Gen Z) आहेत. २०१० नंतर जन्मलेले 'अल्फा' (Alpha) आहेत. त्यामुळे आंदोलनात आदित्य ठाकरे सहभागी होणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.

Sanjay Raut on Pradeep Purnekar Murder
Pradeep Purnekar Death: पप्या कार्यालयात आला, आरोपींना हिंट दिली अन् गोळीबारानंतर रुग्णालयातही गेला पण...

रोहित पवार संशोधन करूनच बोलतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार हे संशोधन करूनच बोलतात. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत त्यांच्याकडे काही माहिती आली असेल, तर त्यांनी ती देशासमोर आणावी. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार जेवढी माहिती घ्यायचे काम करतात, तेवढे पोलीस आणि इतर विभाग करत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news