Pradeep Purnekar Death: पप्या कार्यालयात आला, आरोपींना हिंट दिली अन् गोळीबारानंतर रुग्णालयातही गेला पण...

Pradeep Purnekar News: पूर्णेकरांसोबत गप्पा मारल्या, आरोपींना पूर्णेकर कार्यालयात आहे ही माहिती पप्यानेच दिली होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.
Pradeep Purnkear Case
Pradeep Purnkear CasePudhari
Published on: 
Updated on: 

Pradeep Purnekar Death Case
ठाणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणात बुधवारी माहिती समोर आली आहे. आरोपी पप्या शिंदे हा पूर्णेकर यांना ओळखत होता. हत्येच्या काही वेळेपूर्वी तो कार्यालयात आला. पूर्णेकरांसोबत गप्पा मारल्या, आरोपींना पूर्णेकर कार्यालयात आहे ही माहिती पप्यानेच दिली होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ठाण्यात मंगळवारी रात्री प्रदीप पुर्णेकर यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने बुधवारी ठाण्यात बंदची हाक देण्यात आली असून दुपारी सह पोलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली.

पप्या कालयात आला अन्...

पोलिसांनी पप्या शिंदे या आरोपीला अटक केली आहे. पप्या शिंदे हा आधीपासूनच कार्यालयात जाऊन बसला होता. पप्या हा पूर्णेकरांना आधीपासून ओळखत असल्याने मित्र म्हणून तो नियमितपणे कार्यालयात यायचा. मंगळवारीही तो बराच वेळ पूर्णेकरांशी गप्पा मारत बसला आणि नंतर आरोपींनाही त्यानेच हिंट दिल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

गोळीबारानंतर पप्या हा पूर्णेकरांसोबत रुग्णालयातही गेला. चौघे हल्लेखोर पळून गेले पण पप्या तिथेच थांबला होता. मात्र, पोलिसांना पप्यावर संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत धागेदोरे मिळताच पोलिसांनी पप्याला अटक केली. पप्याने हा कट कसा रचला, मुख्य सूत्रधार कोण याचा पोलीस तपास करत आहेत.

टल्ली आणि शूटर

चार जणांनी हल्ला केला. यात दोघांकडे पिस्तूल होते तर दोघे कोयता, चॉपर घेऊन आले होते. आधी दोघांनी गोळ्या झाडल्या मग अन्य दोघांनी कोयत्याने वार केले. यात गोळीबार करणाऱ्यांची नावे समोर आली आहे. कनोजिया उर्फ टल्ली आणि शूटर अशी आरोपींची टोपण नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news