Mumbai News | संजय राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग'चे आज प्रकाशन

Political Book | प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वा. होणार प्रकाशन
 Political Book
Sanjay Raut Narkatla Swarg Book(File Photo)
Published on
Updated on

Political Book

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांना एका जमीन प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर त्यांना आर्थर रोड येथील तुरुंगात तीन महिने राहावे लागले होते. तुरुंगात असताना आलेल्या अनुभवांवर आधारित त्यांनी लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे सायंकाळी ६ वा. होणार आहे.

या प्रकाशन सोहोळ्याला ज्येष्ठ पटकथाकार लेखक जावेद अख्तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

 Political Book
Mumbai Political News : उत्तर मुंबईत ठाकरे गटाला आणखी एक धक्का? माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचा राजीनामा

राज ठाकरेंनी फोन करायला पाहिजे होता

पुस्तक प्रकाशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मनसेप्रमुख राज ठाकरेंबद्दल नाराजी व्यक्त केली. तुरुंगात गेल्यानंतर राज ठाकरे यांनी एक तरी फोन करायला पाहिजे होता, अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे. राऊत म्हणाले, राज ठाकरे माझे चांगले मित्र होते, त्यांचे आणि माझे चांगले संबंध होते. राजकारण जरी वेगळे झाले तरी संकटकाळात घरच्यांना, कुटुंबाला दिलासा देणारा एखादा फोन जरी गेला तरी एक आधार असतो की कुणीतरी आपल्यासोबत आहे. कारण ज्या पद्धतीने आमच्यावरती संकटांचा पहाड कोसळला होता, व्यक्तिशः नव्हे तर कुटुंबावर, तेव्हा एक काडीचाही आधार असतो, कुणीतरी फुंकर मारते ते महत्त्वाचे असते, असेही राऊत म्हणाले.

 Political Book
Sanjay Raut Narakatla Swarg book | संजय राऊत पाकिस्तानसारखेच, गुन्हे करायचे आणि...; संदीप देशपांडेंची टीका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news