

Sanjay Raut On Marathwada Rain :
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत माराठवाड्यात होत असलेल्या पावसाबद्दल आणि त्यामुळं होणाऱ्या शेतकरी अन् शेतीच्या नुकसानीबद्दल वक्तव्य केलं. त्यांनी संपूर्ण मराठवाडा मुसळधार पावसाने आणि पुराने जवळ जवळ पाण्याखाली गेलाय. हाहाकार आणि आक्रोश आहे, अनेक भागात पावसाने कहर माजवलेला आहे. असं वक्तव्य केलं.
याचबरोबर त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठाण्याीतल मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनावरून टोमणा मारला. त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आता मराठवाड्याकडं लक्ष द्यावं असं देखील म्हटलं.
संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, 'राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावी अशी परिस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत आहेत. मोनोरेल मेट्रोचं उद्घाटन ठाण्यात होत आहे. राजकीय भाषण करत आहेत. निवडणुकीची आखणी करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे सहकारी देखील त्यात अडकले आहेत. मात्र यातून थोडं बाहेर येऊन सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याकडं देखील लक्ष देण्याची गरज आहे.'
संजय राऊत यांनी केंद्र सरकारनं देखील मोठी मदत करावी अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, 'जिथं जिथं परिस्थिती बिकट झाली आहेत तिथं विशेष लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं मराठवाडा हा देशाचाच भाग समजून खूप मोठी मदत करणं गरजेचं आहे.'
ते पुढे म्हणाले, 'पंजाबला पूर आला आहे. पंजाब देखील पुरात वाहून गेलं आहे. पंजाबसारख्या राज्याला पंतप्रधानांनी अत्यंत तुटपुंजी मदत केली. गुजरातला जास्त मदत मिळते अशी लोकांची भावना आहे. आम्ही देखील याच देशाचे घटक आहोत. पंतप्रधान आमचे देखील आहेत. मराठवाडा निजामाविरूद्ध लढला आहे. त्याला तुम्ही अशा प्रकारे नाकारू शकत नाही.
महाराष्ट्रावर ९ लाख कोटी रूपयांचं कर्ज झालं आहे. त्यामुळं राज्य सरकार मराठवाड्याला किती मदत करू शकले हे सांगता येत नाही. त्यामुळं मराठवाड्याला मदत करण्याची जबाबदारी केंद्राची आहे असं देखील राऊत म्हणाले.