

Sanjay Raut Statement On Sahibzada Farhan :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि कर्णधार सूर्य कुमार यादव यांच्यावर टीका केली. पाकिस्तानी खेळाडू साहिबजादा फरहान यानं केलेल्या सेलिब्रेशनवर देखील तोंडसुख घेत त्याच्या कंबरड्यात लाथ घालायला हवी असं वक्तव्य केलं. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्यांच्या देशाला संबोधन करण्याची टायमिंग ही या भारत पाकिस्तान सामन्यासाठीच बदलली असा देखील आरोप त्यांनी केला.
संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले, 'पंतप्रधान सहसा रात्री आठ वाजता बोलतात, कारण ती देशाला 'धक्का देण्याची' वेळ असते. परंतु काल भारत - पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ते पाच वाजता का बोलले, देशाला, तसेच अंधभक्त आणि भाजप समर्थकांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहता यावा. यासाठी ते पाच वाजता बोलले.'
ते पुढे म्हणाले, 'काल आठ वाजता क्रिकेट सामना असल्याने, प्रधानमंत्र्यांनी पाच वाजता जीएसटीच्या सवलतीची घोषणा केली. जीएसटीमध्ये सवलती दिल्याचा दावा केला जात असला तरी, हा खोटारडेपणा आहे. साधारण दोन लाख कोटींची सवलत दिली गेली असली तरी, 140 कोटी भारतीय नागरिकांना वर्षाला फक्त १४०० रूपये किंवा महिन्याला 110 ते ₹120 इतकाच लाभ होणार आहे. हे मूर्ख बनवण्याचे धंदे आहेत. त्यापेक्षा मोदींनी प्रत्येकी १५ लाख रूपये दिले असते तर अधिक सोयीचं झालं असतं.'
राऊतांनी साहिबजादा फरहान याच्या आक्षेपार्ह सेलिब्रेशनवर देखील वक्तव्य केलं. 'पंतप्रधान स्वतः आणि अमित शहा यांनीही कालचा भारत-पाकिस्तान सामना पाहिला असेल, कारण जय शहा हे त्यांचे 'घरचे' आहेत.
फरहाननं एके ४७ सेलिब्रेशन केल्याचा दावा करत राऊत यांनी कृती पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये २६ निरपराध लोकांना ठार मारल्याची प्रतिकात्मक कृती होती का असा देखील सवाल केला.
संजय राऊतांनी यामुळं शहीदांचा आणि मृत नागरिकांचा अपमान झालाय. जय शहा यांच्यासह संपूर्ण भारतीय संघ ही कृती थंडपणे पाहत होती. सूर्यकुमार यादवनं फरहानच्या कंबरड्यात लाथ घालायला पाहिज होती असं देखील म्हटलं. राऊत यांनी राऊत यांनी उपरोधिकपणे म्हटले की, इतके महान 'राष्ट्रभक्तीचे' कार्य करणाऱ्या जय शहा यांना भारतरत्न दिला पाहिजे.'