

Sanjay Gaikwad Controversial Statement :
आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी कायम चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निडणुकीत किती पैसे लागतात याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता त्यांनी घुमजाव केलं असून मी हे वक्तव्य महायुतीच्या संदर्भात नाही तर माहविकास आघाडीच्या उमेदवारांच्या संदर्भात केलं होतं अशी सारवासारव केली. त्यांनी हे वक्तव्य नागपुरात केलं होतं.
आधी आपण संजय गायकवाड काय बोलले होते ते पाहुयात.... गायकवाड म्हणाले, आम्ही भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीला प्राधान्य देतो. आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुकीत युती करतो, पण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. यावेळी आपण त्यांना वार्यावर सोडतो. आता निवडणुका पूर्वीसारख्या राहिल्या नाहीत.'
'काही ठिकाणी एक-दोन तर काही ठिकाणी तीन कोटी रुपये खर्च करावा लागतो. काही ठिकाणी एका व्यक्तीकडून 100 बोकड द्यावे लागतात. एवढ्या खर्चिक निवडणुकीत कार्यकर्ते उद्ध्वस्त होतात. जर चिखली, मलकापूर आणि खामगावचे धोरण ठरले, तेच धोरण बुलढाणा ठरत असेल, तर आम्ही युतीला तयार आहोत.'
या वक्तव्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर टीका होऊ लागली. यापूर्वी देखील संजय गायकवाड हे त्यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळं अन् वादग्रस्त वक्तव्यांवरून टीकेचे धनी झाले आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार तंबी देण्यात आली आहे. मात्र ते काही सुधरण्याचं नाव घेत नाहीयेत.
दरम्यान, आज बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी विरोधी पक्षाला शब्दांचा विपर्यास करण्याची सवय आहे. त्यांनी १०० बोकडं आणि ३ कोटीं रूपयांच्या विधानाचा विपर्यास केला. हे विधान शंभर टक्के खरं आहे. विरोधकांना वाटलं की ते आमच्याच उमेदवाराबद्दल आहे.
संजय गायकवाड पुढे म्हणाले, बुलढाणा तालुक्यातील दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाचा उमेदवार आणि एका ठिकाणी उबाठा गटाचा उमेदवार या दोन्ही उमदेवारांनी निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला होता. त्याच ठिकाणी १०० बोकड कापले होते. ज्यांना खोटं वाटतंय त्यांनी मतदारसंघात जाऊन चौकशी करा.