

ठाणे : शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची फेसबुक तसेच एक्सवरील पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यांनी आपल्या या पोस्टमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. ‘बरेचसे ठाणे आता विकायला आणि रिपेअर ला काढलेय , मुंबई इतकेच ठाणे शिवसेना प्रमुखांचे प्रिय शहर होते‘. असे म्हणत शिंदेसेनेच्या नेत्यांकडून राऊत यांना ठाण्यात फिरू देणार नसल्याच्या वक्तव्याचा एक्सवरील या पोस्टमधून समाचार घेतला.
आनंद दिघे यांच्या वर केलेल्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाण्यात संजय राऊत यांना फिरू देणार नाही असा दिला होता इशारा. शिंदेंच्या शिवसेनेला डीवचण्यासाठी राऊतांनी ही पोस्ट केली आहे. दरम्यान काल त्यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी शिंदे गटाचे आव्हान स्विकारत आहे असं सांगत काल रात्री ठाण्यात जाऊन आलो आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. मी एकटा फिरतो. माझ्यासोबत सरकारी पोलीस बंदोबस्त किंवा गाड्यांचा ताफा नसतो. असेही त्यांनी म्हटले होते.
या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे की दुपारपासून ठाण्यात होतो, आताच मुलुंड टोल नाक्यावरून मुंबईत प्रवेश केला, अनेक भेटीगाठी झाल्या, मुसळधार पावसात ठाणे मजेदार असते, बरेचसे ठाणे आता विकायला आणि रिपेअर ला काढलेय!मुंबई इतकेच ठाणे शिवसेना प्रमुखांचे प्रिय शहर होते, असा उल्लेख करत ठाणे शहराला धन्यवाद म्हटले आहे.
काल घेतलेल्या पत्रकार परिषद घेत शिवसेना शिंदे गटाकडून मिळणाऱ्या धमक्यांना सडेतोड उत्तर दिले होते. संजय राऊत यांनी आपण सच्चा शिवसैनिक असून कोणाला घाबरत नाही असं सांगितलं. अस सांगत मी प्रसंगी तुरुंगात गेलो पण कोणालाही घाबरलो नाही असे अमित शहा यांच्या नाव घेऊन सांगितले होते. त्यानंतर आज त्यांनी आपल्या आपल्या फेसबुक तसेच एक्सवरील पोस्टमधून शिंदेसेनेला डिवचले आहे.