Sanjay Raut On Eknath Shinde :
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जबरदस्त टीका केली. न्यायालयानं नगविकास खात्याचे काही निर्णय बेकायदेशीर ठरवले. त्याचाच धागा पकडून संजय राऊत यांनी नगविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
संजय राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे हे स्वतःच बेकायदेशीर आहेत. त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह बेकायदेशीर आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे अशा बेकायदेशील लोकांना मांडीवर घेऊन बसलेत. कोर्टाला सांगावलं लागतं. नगविकास खातं हे पैसा खाणारं खातं झालं आहे. फडणवीस यांनी फक्त निरीक्षण नोंदवू नये तर कारवाई करून दाखवावी असं आव्हान देखील संजय राऊतांनी दिलं.
भाजपनं शिवसेनेला मुंबई महापालिकेचा महापौर एखाद्या खानाला करायचं आहे अशी टीका केली होती. त्याला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी, 'देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मुंबईचे अध्यक्ष बरेच काही बोलले. महापौर पदी शिवसेनेला खान बसवायचाय. अब्ल्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं? अरिफ महोम्मद खान यांना बिहारचं राज्यपाल कोणी केलं. अशी अनेक उदाहरणं मला देता येतील.' असा सवाल केला.
संजय राऊत पुढे म्हणाले, 'या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि आणि सामाजिक जडण घडणीत भाजपचं काही योगदान नाही. आरएसएस देखील नव्हता. मात्र मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाज स्वातंत्र्य लढ्यात सामजिक चळवळीत होता. त्यांनी जरा हमीद दलवाईंविषयी अभ्यास करावा.