

मुंबई : दहिसर ते गुंदवली मेट्रो 7 व दहिसर ते अंधेरी मेट्रो 2 अ या मेट्रो मार्गिकेची दैनंदिन प्रवासी संख्या साडे तीन लाखांवर पोहोचली आहे. 16 सप्टेंबरला एका दिवसात 3 लाख 40 हजार 571 प्रवाशांनी या प्रवास केला.
मेट्रो 2 अ व मेट्रो 7 ही संयुक्त मेट्रो मार्गिका 2021-22 साली सुरू झाली. त्यानंतर 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रथमच प्रवासी संख्या 2 लाख 69 हजार 230वर पोहोचली. त्यानंतर 13 ऑगस्ट 2024 रोजी 2 लाख 78 हजार 443 प्रवाशांनी प्रवास केला. 3 सप्टेंबर 2024 रोजी 2 लाख 79 हजार 717 जणांनी मेट्रोने प्रवास केला. 5 सप्टेंबर 2024 रोजी 2 लाख 81 हजार 249 व 7 ऑक्टोबर 2024 रोजी 2 लाख 92 हजार 575 इतकी दैनंदिन प्रवासी संख्या होती.