Sanjay Raut: 'शिंदे गटाकडून मविआच्या आमदाराला २० कोटींची ऑफर'; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केला.
Sanjay Raut
Sanjay RautPudhari
Published on
Updated on

Sanjay Raut

मुंबई: महाविकास आघाडीचा आणखी एक आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज केला. विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांना शिंदे गटाकडून २० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली असून आगामी निवडणुकीत पुन्हा आमदारकीचे आश्वासनही देण्यात आल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut
Operation Tiger Success : अखेर शिवसेना ठाकरे गटाच्‍या बंडखोर खासदारांनी केली पक्षांतराची घोषणा

...तर सत्ताधाऱ्यांनी विष पिऊन मरावं; राऊतांचा घणाघात

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी राम मंदिर उभारणीतील कथित भ्रष्टाचारावरून सत्ताधाऱ्यांवर अत्यंत तिखट शब्दांत हल्लाबोल केला. "राम मंदिर बांधताना यांनी चोरी केली आहे. हा चोरीचा पैसा त्यांना आणि त्यांच्या पोराबाळांना कधीही पचणार नाही. सीतामाईचे पैंजण, कंठहार आणि प्रभू रामाची आभूषणे चोरीला गेली आहेत. जर हे खरं असेल, तर या सत्ताधाऱ्यांनी विष पिऊन मेलं पाहिजे," अशा संतप्त शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

"सध्याच्या या चोरीच्या प्रकरणात २५ मेहमूद गजनवी सक्रिय असून, त्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांचाही समावेश असू शकतो," असा संशय त्यांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल होण्यावर राऊत यांनी प्रसिद्ध लेखक लिओ टोल्स्टॉय यांच्या कथेचा दाखला देत खोचक टीका केली. "मी 'रोखठोक' सदरामध्ये एका म्हाताऱ्याची गोष्ट लिहिली आहे, जो जास्तीत जास्त जमीन मिळवण्याच्या लालसेपोटी दिवसभर पळत राहिला, जेवलाही नाही आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातही सध्या असे अनेक म्हातारे आहेत," असा टोला त्यांनी लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, "टोल्स्टॉय यांच्या कथेतील म्हातारा अतिश्रमामुळे कोसळला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सध्या अतिश्रमामुळे रुग्णालयात दाखल आहेत. खासदार फोड, आमदार फोड अशा जोडतोडीच्या राजकारणामुळे आणि धावपळीमुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. माणसाने कितीही हाव धरली, तरी शेवटी प्रत्येकाला चार फूट जागेतच जायचे असते, याचे भान ठेवले पाहिजे," असा टोला राऊत यांनी शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

Sanjay Raut
Thackeray Vs Shinde: राज्याच्या राजकारणात पुन्हा शिवसेना विरुद्ध शिवसेना संघर्ष

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news