Sanjay Gandhi National Park-संजय गांधी उद्यानाची एक हजार एकर जमीन वन विभागाचीच

सातबारा उताऱ्यावर 'महाराष्ट्र शासन राखीव वने' नोंद; खासगी हस्तांतरणापासून राहणार सुरक्षित
SGNP land
SGNP land
Published on
Updated on

मुंबई : घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा-ओवळे येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या ताब्यातील १ हजार ५३ एकर वनजमिनीवरील वन विभागाचा हक्क कायम ठेवण्यात आला आहे. या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर 'महाराष्ट्र शासन राखीव वने' तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची नोंद कायम ठेवण्याचा अंतिम आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

SGNP land
Shiv Sena symbol case : 'फरक पडतो, अपात्रतेच्या कारवाईत सहसा...' ; शिवसेना प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने काय सांगितले?

संबंधित वनजमीन यापुढे खासगी हस्तांतरणापासून सुरक्षित राहणार असून, जमिनीवरील अनिर्बंध विकास आणि मोठ्या बांधकामांना प्रतिबंध राहणार आहे. या निर्णयामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतचा महत्त्वाचा हरित पट्टा आणि वनक्षेत्र अबाधित राहणार असून, वनाची जमीन वनालाच राहिली पाहिजे, ही राज्य सरकारची भूमिका पुन्हा अधोरेखित झाली आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

महसूल न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीतील आदेशानुसार, घोडबंदर मार्गावरील भाईंदरपाडा (ओवळे) येथील जुना सव्र्व्हे क्र. २९१ पैकी (नवीन स.क्र. २२/१, २२/४, २२/५) आणि जुना सर्व्हे क्र. २९७ पैकी (नवीन स.क्र. २१) अशी एकूण १,०५३ एकर जमीन १९७५ पासून वन विभागाच्या ताब्यात असून सातबारा उताऱ्यावर 'महाराष्ट्र शासन राखीव वने' अशी नोंद होती. मात्र, या जमिनीवर खासगी खातेदारांचे (संदीप रतनलाल माखेचा व इतर) नाव दाखल करणारी विवादित फेरफार नोंद क्र. ९७५ ही अपर विभागीय आयुक्त (कोकण विभाग) यांच्या ११ जानेवारी २०१९ च्या निर्णयान्वये कायम झाली होती. तसेच, महसूल न्यायालयाच्या ३१ डिसेंबर २०२५ च्या जुन्या आदेशामुळे ही जमीन खासगी खातेदारांकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

SGNP land
जानेवारीत म्हाडा मुंबईची पुन्हा सोडत, म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची घोषणा

या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २५८ अन्वये दाखल पुनर्विलोकन अर्जावर सुनावणी घेतली.

महसूल मंत्री बावनकुळे यांनी ३१ डिसेंबर २०२५ चे आदेश आणि कोकण आयुक्तांचे ११ जानेवारी २०१९ चे आदेश रद्द ठरवत उपविभागीय अधिकारी (ठाणे) यांचा १ ऑगस्ट २०१५ चा आणि अपर जिल्हाधिकारी (ठाणे) यांचा २१ मार्च २०१७ चा आदेश कायम ठेवला. यानुसार खासगी खातेदारांची नावे दाखल करणारी फेरफार नोंद क्र. ९७५ रद्द करण्यात आली असून, सातबारा उताऱ्यावर 'महाराष्ट्र शासन राखीव वने' आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची नोंद कायम ठेवून संबंधित जमीन वर्ग-२ म्हणून ठेवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news