Samruddhi Mahamarg traffic: समृद्धी महामार्गावर 9 ते 18 फेब्रुवारी दरम्यान टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद

बुलढाणा–जालना दरम्यान गॅन्ट्री उभारणी; प्रत्येक टप्प्यात 45 ते 60 मिनिटांचा ट्रॅफिक ब्लॉक
Samruddhi Mahamarg traffic
Samruddhi Mahamarg trafficPudhari
Published on
Updated on

मुंबई : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर बुलढाणा व जालना जिल्ह्यात 9 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या कालावधीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गॅन्ट्री उभारण्याचे काम 9 टप्प्यांत प्रस्तावित आहे. या काळात काही भागांतील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

Samruddhi Mahamarg traffic
Mumbai Local Train Update: गोरेगाव ते सीएसएमटी लोकल सेवा तीन महिने बंद; पश्चिम रेल्वे प्रवाशांना मोठा फटका

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा आणि जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यातून जाणाऱ्या 300.400 किमी ते 365.800 किमी दरम्यान महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम अंतर्गत ही गॅन्ट्री उभारली जाणार आहे. प्रत्येक संबधित वाहिनीवरील वाहतूक 45 ते 60 मिनिटांच्या कालावधीकरता पूर्ण थांबवण्यात येणार आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येईल.

Samruddhi Mahamarg traffic
NCP Merger Debate: अजित पवारांच्या अंत्यदर्शनस्थळी विलीनीकरणाची चर्चा कोणी घडवली? – सुनील तटकरे यांचा शरद पवार गटावर संताप

मुंबई वाहिनीवर 9 ते 11 फेब्रुवारी आणि 13 ते 17 फेब्रुवारी या काळात दुपारी 12 ते 1 दरम्यान गॅन्ट्री बसवण्याचे काम केले जाणार आहे. 9, 10 व 12, 13 तसेच 16, 17 फेब्रुवारी या कालावधीत दुपारी 3 ते 4 या वेळेत नागपूर वाहिनीवरील वाहतूक बंद राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news