Sahil Wakode IIT Mumbai protest| साहिल वाकोडेच्या पालकांसह आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई आयआयटीतील महिनाभरापासून सुरू असलेले आंदोलनस्थळ हटविले
Mumbai
मुंबई : साहिल वाकोडेला न्याय मिळावा यासाठी मुंबई आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करताना विविध विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते. (छाया : दीपक साळवी)pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : आयआयटी बॉम्बेचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाल्यानंतर न्यायाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला रविवारी नवे वळण मिळाले. साहिलचे आई-वडील रवींद्र आणि सोनाली वाकोडे हे मुलाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पवई येथील आयआयटी मुंबई परिसरात पोहोचले. मात्र, तेथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांनाही मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ महिनाभरापासून सुरू असलेले आंदोलनस्थळही पोलिसांनी हटविले.

साहिलच्या पालकांनी संस्थेच्या कुलसचिवांना पत्र देऊन मुलाच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. कुटुंबीयांचे वकील सिद्धार्थ इंगळे हेही त्यांच्यासोबत होते. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी पालकांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचा आरोप वकिलांनी केला.

रविवारी पालक संस्थेत पोहोचण्यापूर्वी सुमारे दहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. काही वेळाने त्यांची सुटका झाल्यानंतर ते पुन्हा आंदोलनात सहभागी झाले. त्यानंतर आंदोलनस्थळ हटविताना सुमारे १६ विद्यार्थ्यांना पोलिसांच्या वाहनातून तेथून नेण्यात आले.

Mumbai
AI in religious and astrology apps| धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक ॲप्सची चलती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय

प्रा. डुल्ला यांच्या अटकेची मागणी

साहिलच्या मृत्यूप्रकरणी प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांच्या अटकेची मागणी त्याच्या पालकांनी केली आहे. या प्रकरणातील प्रथम माहिती अहवालात प्राध्यापकाचे नाव आहे. संबंधित प्राध्यापकावर कारवाई करावी आणि तपास निष्पक्षपणे व्हावा, अशी कुटुंबीयांनी यावेळी मागणी केली

Mumbai
Universities as centers of innovation|शिक्षणासोबत नवसंशोधन, सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक : मुख्यमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news