Universities as centers of innovation|शिक्षणासोबत नवसंशोधन, सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक : मुख्यमंत्री

शिक्षणासोबत नवसंशोधन, सामाजिक बांधिलकी जपणे आवश्यक : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा येथे 'अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च' (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या १७ व्या दीक्षान्त समारंभात विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते मानद डी. लिट. ही उपाधी प्रदान करण्यात आली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा येथे 'अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च' (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या १७ व्या दीक्षान्त समारंभात विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते मानद डी. लिट. ही उपाधी प्रदान करण्यात आली.pudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : आजच्या काळात सातत्याने नवीन ज्ञान आणि कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता संशोधनाला प्रोत्साहन देणारी नवसंशोधनाची केंद्रे बनले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्धा येथील 'अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च' (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या १७ व्या दीक्षान्त समारंभात प्रमुख उपस्थिती दर्शवली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुमारे २ हजार विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.

सोबतच संस्थेच्या या सतराव्या दीक्षान्त समारंभात सार्वजनिक जीवनातील लोकाभिमुख शासन व्यवस्था, संस्थात्मक विकास, पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक उन्नती, समाजकल्याण आणि विशेषतः जलसंधारण या क्षेत्रांतील योगदानाबद्दल विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते मुख्यमंत्री फडणवीस यांना मानद डी. लिट. ही उपाधी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर, कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाचे अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा येथे 'अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च' (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या १७ व्या दीक्षान्त समारंभात विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते मानद डी. लिट. ही उपाधी प्रदान करण्यात आली.
ED raids in Mumbai-Pune | मुंबई, पुण्यासह २० ठिकाणी ईडीचे छापे

वैद्यकीय क्षेत्रात एआयच्या वापरातून आजारांचे लवकर निदान अचूक उपचार आणि नवसंशोधनाल मोठी चालना मिळत आहे. विद्यापीठांन केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता, नवीन औषधे, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारी नवसंशोधनाची केंद्रे बनले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्धा येथे 'अदानी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च' (अभिमत विद्यापीठ) या संस्थेच्या १७ व्या दीक्षान्त समारंभात विद्यापीठाच्या कुलपती डॉ. प्रीती अदानी यांच्या हस्ते मानद डी. लिट. ही उपाधी प्रदान करण्यात आली.
Tiger Shroff Juhu Firing: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अभिनेता टायगर श्रॉफची भेट; म्हणाले, 'मुंबईत गुन्हेगारी टोळीची...'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news