AI in religious and astrology apps| धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक ॲप्सची चलती, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढतोय

नऊ महिन्यांत तब्बल ३० कोटी डाउनलोड्स, ज्योतिषविषयक अॅप्सच्या डाउनलोडमध्ये ७५ टक्के वाढ
AI in religious, astrology apps
AI in religious and astrology appsAI IMAGE
Published on: 
Updated on: 

मुंबई : भजने ऐकण्यापासून ते बायबल वाचण्यापर्यंत, मक्केची दिशा शोधण्यापासून ते ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींमधून भविष्य जाणून घेण्यापर्यंत, भारतीय नागरिकांचा श्रद्धा आणि धार्मिक बार्बीसाठी स्मार्टफोनवरील अॅप्सचा वापर वाढत आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि ज्योतिषविषयक अॅप्सना २०२६ मधील पहिल्या नऊ महिन्यांत जवळपास ३० कोटी डाउनलोड्स मिळाले आहेत. भारतीय अॅप अर्थव्यवस्थेतील हे वेगाने वाढणारे क्षेत्र ठरत आहे.

सेन्सर टॉवर या मार्केट इंटेलिजन्स संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या काळात ज्योतिषविषयक अॅप्सचे १५ कोटी डाउनलोड्स झाले. गेल्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ ७५ टक्के आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक अॅप्सना १४.६ कोटी डाउनलोड्स मिळाले असून, त्यात ४७टक्क्यांची वाढ झाली. त्यामुळे या क्षेत्रातील गुंतवणूकदेखील वाढत आहे. या दोन्ही श्रेणींना मिळून २०२५ मध्ये संपूर्ण वर्षभरात झालेल्या २४.८ कोटी डाउनलोड्सचा आकडा २०२६ च्या पहिल्या नऊ महिन्यांतच पार केला आहे.

सर्वाधिक लोकप्रिय ॲप्स

सनातन स्टेटस भजन मंत्र, यूव्हर्शन बायबल, वी मुस्लिम, श्री मंदिर, मुस्लिम प्रो. धार्मिक आणि आध्यात्मिक अॅप्सचा वापर विविध धर्मांमध्ये वाढताना दिसत आहे. सरासरी मासिक सक्रिय वापरकर्त्यांच्या संख्येनुसार सनातन स्टेटस भजन मंत्र हे अॅप या श्रेणीत आघाडीवर आहे. त्यानंतर यूव्हर्शन बायबल अॅप आणि वी मुस्लिम यांचा क्रमांक लागतो.

यूव्हर्शन बायबल अॅपमध्ये बायबल वाचन आणि ध्वनिमुद्रित धार्मिक मजकुराची सुविधा आहे. वी मुस्लिम अॅपद्वारे नमाजाच्या वेळा आणि किब्लाची दिशा समजते. ऑनलाइन पूजा आणि धार्मिक सेवांची सुविधा देणारे श्री मंदिर चौथ्या क्रमांकावर आहे. कुराण वाचन आणि नमाजाशी संबंधित सुविधा देणारे मुस्लिम प्रो या पहिल्या पाच अॅप्समध्ये आहे.

AI in religious, astrology apps
Tiger Shroff Firing Case: तीन मालक, कागदपत्रांचा घोळ अन् गोळीबार! टायगर श्रॉफ प्रकरणात पल्सर बाईक जप्त; तपासात नवा खुलासा

वापरकर्त्यांच्या संख्येतही मोठी वाढ दिसून येते. सनातन स्टेटस भजन मंत्रच्या सरासरी मासिक सक्रिय वापरकर्त्यांमध्ये वर्षभरात १०९ टक्क्यांची वाढ झाली. यूव्हर्शनमध्ये २४ टक्के, तर वी मुस्लिममध्ये ३९ टक्के वाढ नोंदवण्यात आली. मुस्लिम प्रोच्या वापरकर्त्यांमध्ये मात्र ५ टक्के वाढ झाली. दुसरीकडे, श्री मंदिरच्या डाउनलोड्समध्ये २० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले.

सेन्सर टॉवरचे विश्लेषक ईव्ह चेन यांच्या मते, भारतातील धार्मिक आणि ज्योतिषविषयक परंपरांशी असलेली घट्ट सांस्कृतिक नाळ आणि स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे या अॅप्सच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय नागरिक या अॅप्सवर अधिक वेळ घालवत आहेत. २०२२ च्या पहिल्या तिमाहीत धार्मिक आणि आध्यात्मिक अॅप्सचा सरासरी दैनंदिन वापर ५.८ मिनिटे होता. २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत तो ८.२ मिनिटांवर पोहोचला. म्हणजेच त्यात ४० टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ज्योतिषविषयक अॅप्सचा वापरही वाढला आहे. त्यांचा सरासरी दैनंदिन वापर ३.५ मिनिटांवरून ५.३ मिनिटांपर्यंत पोहोचला. ही वाढ ५० टक्क्यांहून अधिक आहे.

AI in religious, astrology apps
Malad Protest : मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पाविरोधात मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पोलिसांनी अडवले
  • ज्योतिषविषयक अॅप्समध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढत असल्याचेही दिसून येते. अॅस्ट्रोटॉक या अॅपला ३ कोटी डाउनलोड्स मिळाले.

  • त्यानंतर अॅस्ट्रो सेज कुंडली: एआय अॅस्ट्रोलॉजी या अॅपचा क्रमांक लागतो. या अॅपला २.५ कोटी डाउनलोड्स मिळाले असून, त्यात १७२ टक्क्यांची वाढ झाली.

  • नव्या टॅरो ९९ या अॅपला १.१ कोटी डाउनलोड्स मिळाले, तर अॅस्ट्रोलोक या अॅपच्या डाउनलोड्समध्ये तब्बल १,०६२ टक्क्यांची वाढ होऊन हा आकडा जवळपास ७५ लाखांवर पोहोचला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news